शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या उत्पादन तंत्रज्ञानाला देणार मुल्य विकासाची जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

नागपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन तंत्रज्ञान आणि त्यांच्या परिश्रमाला उत्तम बाजारपेठेची जोड दिली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून एकदिवसीय ...

नागपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन तंत्रज्ञान आणि त्यांच्या परिश्रमाला उत्तम बाजारपेठेची जोड दिली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून एकदिवसीय जिल्हास्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनाचे आयोजन होणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन होत आहे.

या संमेलनामध्ये समुदाय आधारित संस्था व खरेदीदार यांच्यामध्ये शेतमालाच्या दर्जाबाबत खरेदीदारांच्या अपेक्षा, प्रतवारीनुसार दर व त्यामुळे दरातील फरक याबाबत पीकनिहाय चर्चा तसेच शेतमाल दराबाबतचे धोरण, वाहतूक व्यवस्था, पोहोच, पॅकिंग याबाबत चर्चा होणार आहे. समुदाय आधारित संस्थांना संस्थात्मक खरेदीदारांसोबत काम केल्यास गुणवत्तापूर्ण शेतमालाला योग्य दर, खरेदीमध्ये पारदर्शकता, इतर करांमध्ये होणारी बचत, बाजार व्यवस्थापन, वाहतूक खर्चात बचत, खरेदीची हमी व खरेदीदाराला मिळणारा गुणवत्तापूर्ण शेतमाल या बाबींचा विचार दर निश्चित करताना होणार आहे.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्था व खरेदीदार यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या पोर्टलवर उत्पादन भागीदारी उपप्रकल्पात सहभागी होण्याकरिता अर्ज केले आहेत. सध्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेल्या समुदाय आधारित संस्थांच्या प्रस्तावांची छाननी करण्यात येत आहे. यासाठी संबंधित समुदाय आधारित संस्थांचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प प्रस्ताव स्मार्ट प्रकल्पांतर्गत पात्र होण्याकरिता संस्थात्मक नोंदणीकृत खरेदीदारासोबत सामंजस्य करार होणे बंधनकारक आहे. या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात हे आयोजन होण्याची शक्यता असल्याचे स्मार्ट प्रकल्पाने कळविले आहे. यातील सहभाग नि:शुल्क असून, भाग घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे नोंदणी करता येणार आहे.