शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीप डील’ प्रकरणात कारवाई होणार

By admin | Updated: February 16, 2016 04:01 IST

तपासाशी कसलाही संबंध नसताना मोक्काच्या गुन्हेगारासोबत तब्बल ५३ वेळा संपर्क करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई

नागपूर : तपासाशी कसलाही संबंध नसताना मोक्काच्या गुन्हेगारासोबत तब्बल ५३ वेळा संपर्क करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केले.गुन्हे शाखेतील दोन पोलिसांनी कुख्यात गुंडासोबत ‘टीप डील’ केल्याचे वृत्त लोकमतने १२ फेब्रुवारीला प्रकाशित केले होते. गेल्या चार दिवसांपासून या वृत्ताची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस उपायुक्त शैलेष बलकवडे यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधाने पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली असता उपायुक्त शर्मा यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, ‘टीप डील’ प्रकरणाच्या चौकशीत कुलदीपची संशयास्पद भूमिका उघड झाली आहे. त्याच्या मोबाईलवरून ११ ते २९ डिसेंबर या कालवधीत कुख्यात दिवाकरशी तब्बल ५३ वेळा संपर्क झाला आहे. या प्रकरणाच्या तपासात त्याचा अथवा त्याच्या पथकाचा संबंध नसताना त्याने संपर्क केला, हेच संशयाला बळ देणारे आहे, असे शर्मा यांनी सांगितले. कुलदीपने इमिडेट बॉसच्या आदेशावरून संपर्क केल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत ज्याच्या मोबाईलवरून हे कन्व्हर्शन झाले, तो प्रथम आरोपी ठरतो, असेही उपायुक्त शर्मा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सर्वच गंभीर पोलीस आयुक्तांपासून सारेच वरिष्ठ अधिकारी आणि अनेक कर्मचारी गुन्हेगारीची घाण साफ करण्यासाठी रात्रंदिवस झटत असताना गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी घाण वाढवण्यात पुढाकार घेत असल्याची बाब लोकमतच्या वृत्तामुळे जगजाहीर झाली. त्यामुळे सारेच गंभीर झाले आहेत. त्यामुळे दोषींवर कडक कारवाईचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. त्यामुळेच घाईगडबडीत कारवाई करण्याऐवजी सर्व बाजू तपासण्याचा आणि कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले.