शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेच्या पतीसह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई; माजी नगरसेवकावर केला होता हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:59 IST

Nagpur : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकरचा पती गणेश याच्यासह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकरचा पती गणेश याच्यासह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी मतदानाच्या एक दिवस अगोदर माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले होते. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. शहरातील इतरही गँगविरोधात पोलिस अशीच तत्पर कारवाई करून मकोकासारखी मोठी कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

१४ जानेवारीच्या रात्री गणेश उर्फ घुई आनंदराव चाचेरकर (४०, गोरेवाडा, जुनी वस्ती) याने साथीदारांसोबत मिळून भूषण कृष्णराव शिंगणे (५८), प्रवीण नामदेवराव मते (४९), रुपेश सीताराम ठाकरे (५४) यांना मारहाण करत जखमी केले होते. घुईने शिंगणे यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथे ९० ते १०० लोक हातात फायटर, लाठ्या, गुप्ती, चाकू घेऊन जमले होते. आरोपींनी शिंगणे व मते यांचा फोनदेखील हिसकावला होता. विठ्ठल अडाणे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर घुई व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मंगेश रमेश मांग (३९, गोतमारे ले-आऊट, ब्राह्मणी, कळमेश्वर), नितेश उर्फ नितीन कृष्णाजी बगडे (४०, महाजन ले आऊट, कळमेश्वर), अमित विजय मेश्राम (३४, जोगीनगर, रामेश्वरी), आशिष नामदेवराव भड (४१, सुपर टाऊन, पारशिवनी), अंकुश विजयराव कोचे (३०, पँथर चौक, पुलगाव), रोशन दिलीप परतेकी (३४, गोरेवाडा, जुनी वस्ती), राहुल निर्भय अठरोकार (२५, गोरेवाडा, जुनी वस्ती), योगेश दिलीप कापसे (२७, गोरेवाडा, जुनी वस्ती), पीयूष उर्फ बच्चा राजेंद्र भोंगाडे (२७, भडांगी, कळमेश्वर), सुधीर भाऊराव धुमाळ (३६, गोरेवाडा, जुनी वस्ती), चेतन पांडुरंग युवनाते (२२, गोरेवाडा), सुमित नरेश जामगडे (२९, गोरेवाडा, जुनी वस्ती), तरूण विनोद बमनेरे (२५, माधवनगर, गोरेवाडा) व नीलेश उर्फ अन्ना ब्रिजलाल उईके (महेशनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश होता. आरोपींनी संघटित होऊन गुन्हा केला असून, त्यांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई व्हावी, असा प्रस्ताव झा यांनी अपर पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

इतर गँगवर कारवाई कधी?

आजच्या घडीला शहरात विविध टोळ्या कार्यरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. या प्रकरणात तत्पर असलेल्या पोलिस विभागाकडून शहरातील इतर टोळ्यांविरोधात ठोस कारवाई कधी करण्यात येईल, हा सवाल उपस्थित होत आहे.

१४ जानेवारी भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला

१५ जानेवारी चाचेरकर व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल१५ जानेवारी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली शिंगणे यांची भेट१६ जानेवारी भूषण शिंगणे यांचा पराभव, मंजू चाचेरकर यांचा विजय२७ जानेवारी दोन आठवड्यांच्या आत सर्व आरोपींवर मकोकाची कारवाई

English
हिंदी सारांश
Web Title : Husband of Corporator, 15 Others Booked Under MCOCA for Attack

Web Summary : Husband of newly-elected corporator and 15 others booked under MCOCA for attacking ex-corporator Bhushan Shingane before elections. Police are questioned about similar action against other gangs.
टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर