शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आशिष देशमुखांवर कारवाईचे संकेत, हांडोरेंची चौकशी समिती येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 9:52 PM

Nagpur News काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवसांत नागपुरात दाखल होणार आहेत. चौकशीत देशमुख दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष पटोले म्हणतात दोषी आढळल्यास कारवाई

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर पक्षातर्फे कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहेत. काटोल तालुक्यातील सावरगांव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचार करीत केल्याप्रकरणी देशमुख यांची स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रभारी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे दोन दिवसांत नागपुरात दाखल होणार आहेत. चौकशीत देशमुख दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ( Action committee on Ashish Deshmukh, Hondore's inquiry committee will come)

जि.प. पोटनिवडणुकीत सावरगाव सर्कलमधून पार्वताबाई काळबांडे या भाजपच्या उमेदवार रिंगणात आहेत. काळबांडे यांच्या निवासस्थानी २५ सप्टेंबर रोजी बैठक व छोटेखानी सभा झाली. या बैठकीत आशिष देशमुख उपस्थित होते. त्यांच्यासह भाजपचे उकेश चव्हाण व इतर पदाधिकारीही होते. या बैठकीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. काँग्रेसचे विभागीय बुथ समन्वयक प्रकास वसु यांनी प्रदेश प्रभारी, प्रदेशाध्यक्ष व शिस्तपालन समितीकडे तक्रार करीत देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली.

पटोले यांच्या कार्यकारिणीत नुकतेच आशिष देशमुख यांना सरचिटणीस म्हणून स्थान देण्यात आले आहे. यानंतरही ते भाजप उमेदवाराचा उघड प्रचार करीत असल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, देशमुख यांच्याबाबत तक्रार आली आहे. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी दोन दिवसात चंद्रकांत हांडोरे नागपुरात दाखल होतील. सविस्तर माहिती घेऊन अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करतील. त्यांच्या अहवालात देशमुख हे दोषी असल्याचा निष्कर्ष आला, तर देशमुख यांच्यावर निश्चतपणे कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई

- भाजपशी लढा देण्यासाठी, पक्षाला ताकद देण्यासाठी सामान्य कार्यकर्ता झटत आहे. अशात कोणताही मोठा नेता पक्षविरोधी भूमिका घेत असेल, भाजपला मदत करत असेल, तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. अशांची चौकशी करून कारवाई केली जाईल.

- नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखNana Patoleनाना पटोले