शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकाराविरुद्ध कारवाई

By admin | Updated: January 7, 2015 01:02 IST

सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे या कार्यालयातील पथकाने सावनेर शहरातील अवैध सावकाराच्या घरी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धाड टाकली.

पाच जणांवर गुन्हे दाखल सावनेर : सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे या कार्यालयातील पथकाने सावनेर शहरातील अवैध सावकाराच्या घरी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धाड टाकली. सावकाराच्या घराच्या झडतीदरम्यान १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आढळून आला असून, आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाही. या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटकपूर्व जामीन मिळविल्याने कुणालाही अटक करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई होय.गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सेवकराम राऊत रा. कोदेगाव, ता. सावनेर, सुरेश भापकर रा. गणेश मंदिराजवळ प्रतापनगर नागपूर, आनंदराव सोमकुवर रा. टेकाडी, नीलेश सोमकुवर रा. टेकाडी व भूजंग कुंभरे रा. टेकाडी या पाच जणांचा समावेश आहे. फिर्यादी बळवंत अनंतराम कुहिटे रा. बरडेनगर, नागपूर यांनी अवैध सावकारीसंदर्भात सावनेर येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. बळवंत कुहिटे यांनी सेवकराम राऊत यांच्याशी ४ जुलै २०१३ रोजी नोंदणीकृत पद्धतीने जमिनीच्या खरेदी - विक्रीचा करण्यात आला होता. तसेच चंद्रशेखर यांच्या घराच्या विक्रीबाबत १३ मार्च २०१४ रोजी करारनामा करण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद केले होते. हा व्यवहार अवैध सावकारीचा असल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते.सदर तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवारी दुपारी सेवकराम राऊत यांच्या सावनेरातील घराची झडती घेतली. ते होळी चौकात किरायच्या घरात राहतात. या ठिकाणी नारायण लक्ष्मण सोमकुवर रा. टेकाडी यांच्या नावे असलेला १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आणि चंद्रशेखर भाऊराव कापसे रा. कोथुळणा यांच्या शेतीच्या विक्रीचा करारनामा आढळून आल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली. सदर कारवाई महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये केली असून, या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ४२०, ४४७, ३४, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पथकात सहायक निबंधक अशोक गिरी सावनेर, चैतन्य नासरे कामठी, प्रकाश भजने उमरेड, सुखदेव कोल्हे, संजय आगरकर, पंकज घोडे, नरेश अवचट, अतुल तांबे आदींचा समावेश होता. (तालुका/प्रतिनिधी)बळजबरीने घेतला शेतीचा ताबाफिर्यादी बळवंत कुहिटे यांची टेकाडी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. आर्थिक अडचणीमुळे कुहिटे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची उचल केली होती. त्या मोबदल्यात त्यांनी त्यांच्या शेतीची विक्री रजिस्ट्री करून दिली होती. कुहिटे यांनी सदर रक्कम परत केल्यानंतर शेतीचे विक्रीपत्र परत देण्याचे त्यांना तोंडी सांगण्यात आले होते. मात्र, त्यांची शेती सेवकराम राऊत, सुरेश भापकर, आनंदारव सोमकुवर, नीलेश सोमकुवर आणि भूजंग कुंभरे यांनी बळजबरीने हडपल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारी केला होता. यासंदर्भात कुहिटे यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात तक्रार दाखल केली होती.