मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:08 IST2021-04-01T04:08:30+5:302021-04-01T04:08:30+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ...

Action against 95 people walking without masks | मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ जणांवर कारवाई

मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ जणांवर कारवाई

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ९५ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ४७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,९०० नागरिकांविरुद्ध कारवाई केली. १ कोटी ६८ लाख ९ हजाराचा दंड वसूल केला आहे. रेल्वे स्थानकावरही मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू आहे.

बुधवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २४, धरमपेठ ४, हनुमाननगर १३, धंतोली १०, नेहरूनगर ५, गांधीबाग ३, सतरंजीपुरा ४, लकडगंज ८, आशीनगर १५, मंगळवारी झोनअंतर्गत ७ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Action against 95 people walking without masks