शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टिक वापरणाऱ्या १२९८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:56 IST

प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६६.९० लाखांचा दंड वसूल : मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : एका दुकानदारावर फौजदारी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर लक्ष्मीनगरमधील एका दुकानदारावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.उपद्रव शोध पथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. नागपूर महापालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील चमूकडून २३ जून २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमध्ये १२९८ जणांवर कारवाई करून ६६ लाख ९० हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ९४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे तर संपूर्ण कारवाईमधून २३९१०.२२० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाईमनपा उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील पथकाकडून आलेल्या कारवाईमध्ये दहाही झोनमध्ये सर्वाधिक कारवाई आसीनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक २१८ जणांवर कारवाई करून यामधील २१ जणांना नोटीस बजावण्यात आली. कारवाईमधून ८१५.०७० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच १२ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. धरमपेठ झोनमध्ये १९१ जणांवर कारवाई करून ९ लाख ९६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. झोनमध्ये ९ जणांना नोटीस बजावण्यात आले असून १५४६.४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक कारवाईमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मंगळवारी झोनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमधील १५१ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ७ लाख ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १६ जणांना नोटीस बजावण्यात आली. मंगळवारी झोनमधून २०४१.२५५ किलोग्रॅम प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीnagpurनागपूर