मोबाईलमध्ये फोटो काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 07:22 PM2022-09-13T19:22:25+5:302022-09-13T19:23:22+5:30

Nagpur News मोबाईलमध्ये फोटो काढून ते घरी दाखविण्याची भीती दाखवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Accused who molested by taking photos in mobile phone arrested | मोबाईलमध्ये फोटो काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

मोबाईलमध्ये फोटो काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

Next

नागपूर : मोबाईलमध्ये फोटो काढून ते घरी दाखविण्याची भीती दाखवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मिलिंद पडोले (१९, अशोक नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख होती. त्याने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले व ते तिच्या घरी दाखविण्याची भीती दाखवत तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो वारंवार तिचा पाठलाग करायचा. त्याने सोमवारी तिला रस्त्यात अडवून तिचा हात पकडला व अश्लील कृत्य करत विनयभंग केला. यासंदर्भात मुलीने आपल्या घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी मिलिंदविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

Web Title: Accused who molested by taking photos in mobile phone arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.