शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

चिमुकलीशी चाळे करणा-या आरोपीला जमावाने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:26 AM

पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या एका आरोपीला संतप्त जमावाने बदडले. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गिट्ठीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हास पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देशिकवणी वर्गासमोरून घरात नेले : अनर्थ टळला, नागपूरच्या गिट्टीखदान मधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या एका आरोपीला संतप्त जमावाने बदडले. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गिट्ठीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. उल्हास पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.आरोपी पाटील मूळचा अमरावती जिल्ह्यातील तळेगावचा रहिवासी असल्याचे समजते. रेल्वेचा निलंबित कर्मचारी असलेला पाटील सध्या गिट्टीखदानमधील मनीष सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहतो. त्याच्या खोलीशेजारी शिकवणी वर्ग भरतात. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तेथे एका पालकाने आपल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला सोडले आणि ते घाईगडबडीत निघून गेले. काही वेळेनंतर चिमुकली वर्गाबाहेर आली. आरोपी पाटीलने तिला चॉकलेट आणि आईस्क्रीम देत आपल्या घरात नेले. दार बंद करून तिचे कपडे काढले आणि स्वत:चेही कपडे काढून तो तिच्याशी चाळे करू लागला. घाबरलेली मुलगी जोरात रडू लागल्याने आजूबाजूची मंडळी गोळा झाली. ते लक्षात आल्याने आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीबाहेर आणले. त्याची अवस्था बघून समोरची मंडळी संतापली. त्यांनी रडणाºया मुलीला विचारणा केली असता तिने झालेला प्रकार सांगितला. त्यामुळे शेजारच्यांनी आरोपी पाटीलची बेदम धुलाई केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ देशमुख यांनी गिट्टीखदान ठाण्यात माहिती देऊन पोलिसांना बोलविले. पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पत्नीनेही कानशेकणी केलीआरोपी पाटीलची पत्नी बाहेरगावी खासगी नोकरी करते. त्याला पाच वर्षांचीच मुलगी आहे. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेरून घरी आली. जमावाकडून तिला घडलेला प्रकार कळला. ती रागाने लालबुंद झाली. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत केलेल्या कृत्यामुळे तिने आपल्या नवरोबाला (आरोपीला) दोन कानशिलात लगावल्या. तू तुझे काळे तोंड परत दाखवू नको, असे सुनावत पत्नीने त्याला पोलिसांच्या हवाली करण्याची जमावाला विनंती केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग