शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला हायकोर्टात जामीन

By admin | Updated: November 13, 2015 02:49 IST

भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला.

नागपूर : भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला. जुल्फेकार ऊर्फ छोटू गनी, असे आरोपीचे नाव आहे. धरम दावणे, असे मृताचे नाव होते. प्रकरण असे की, मोठी रक्कम वसूल करण्याच्या हेतूतून गोंदिया येथीलच योगेशकुमार मस्के याच्या मालकीच्या भूखंडावर गनी याने अवैधरीत्या कब्जा केला होता. या भूखंडावर ‘नॉट फॉर सेल’चा फलक उभारला होता. योगेशकुमार याने आपल्या भूखंडावरील गुंडांचा ताबा हटवण्यासाठी धरम दावणे याची मदत घेतली होती. दावणे हा आपल्या कामात अडथळा आणि आहे म्हणून त्याच्या खुनाचा कट रचण्यात आला होता. ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धरम हा आपला मित्र विशाल गजभिये याच्यासोबत शक्ती चौक येथे बोलत असताना गनीने धरमवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. गनीसोबतच्या साथीदारांनी विविध शस्त्रांनी धरमवर हल्ला केला होता. हल्ल्यात विशाल गजभियेही जखमी झाला होता. गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात गनीसह १५ जणांविरुद्ध ३०२,१४९, ३०७, १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गनीचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. डागा यांनी उच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, या प्रकरणातील सर्वच आरोपींचा जामीन झालेला आहे. उत्तरीय तपासणी अहवालानुसार धरम दावणेचा मृत्यू गोळी लागून झाला नाही. गोळी त्याच्या बरगड्यात लागली होती. ‘हेड इन्ज्युरी टू ब्रेन पार्ट अँड लॉस आॅफ ब्लड’, असे मृत्यूचे कारण अहवालात नमूद आहे. आरोपी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने गनीला जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)