मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:17+5:302021-01-04T04:08:17+5:30

नागपूर : कोराडी रोडवरील शिवमंदिर व हनुमानमंदिर तसेच सावनेर रोडवरील साई मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अजनी ...

Accused of breaking temple donation box arrested | मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपींना अटक

मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर : कोराडी रोडवरील शिवमंदिर व हनुमानमंदिर तसेच सावनेर रोडवरील साई मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना अजनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी वाहने सुद्धा चोरली होती. आरोपींकडून पोलिसांनी ५ दुचाकी वाहनांसह १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनमोल प्रेमानंद उके (३७ रा. गोंदिया) हे मेडिकल रुग्णालयात नातेवाईकांना डबा देण्यासाठी आले होते. त्यांची दुचाकी २६ नोव्हेंबर २०२० रोजी मेडिकलमधून चोरी झाली होती. यासंदर्भात त्यांनी अजनी पोलिसांना तक्रार दाखल केली, अजनी पोलिसांचे डी.बी. पथक यासंदर्भात तपास करीत असताना, त्यांना विधीसंघर्षग्रस्त बालक हे बुधवारी आठवडी बाजार, सक्करदरा येथे चोरीची गाडी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या बालकांनी अजनी, हुडकेश्वर, सक्करदरा, राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही वाहनांची चोरी केली होती. वाहन चोरी व घरफोडीचे त्यांच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले. पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे, सहा. पोलीस आयुक्त विजय मराठे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, पोलीस उपनिरीक्षक एन.टी. फड यांच्यासह खेमराज पाटील, अतुल दवंडे, मनोज नेवारी, नीलेश इंगळे आदींनी केली.

Web Title: Accused of breaking temple donation box arrested