शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
3
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
4
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
5
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
6
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
9
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
10
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
11
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
12
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
13
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
14
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
15
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
16
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
17
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
18
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
19
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रथमच मिळणार लेखाजोखा

By admin | Updated: May 16, 2014 00:49 IST

निवडणुकीच्या मतमोजणीत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी यंदा प्रथमच मतमोजणीस्थळी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींना मतमोजणीची प्रत्येक फेरीनिहाय माहिती दिली जाणार आहे.

नागपूर : निवडणुकीच्या मतमोजणीत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी यंदा प्रथमच मतमोजणीस्थळी नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींना मतमोजणीची प्रत्येक फेरीनिहाय माहिती दिली जाणार आहे.

एरवी मतमोजणीच्या वेळी प्रतिनिधींना त्यांच्या उमेदवारांना किती मते मिळाली याची आकडेवारी स्वत: नोंदवावी लागत होती. अनेक वेळा मतदान कर्मचार्‍यांनी जाहीर केलेली व प्रतिनिधींनी नोंदविलेली माहिती यात तफावत येत होती व त्यातून वाद निर्माण होत असत. यातून फेरमतदानाचे प्रसंगही यापूर्वी अनेकदा उद्भवले आहे. यात वेळेचा अपव्यय होतो व इतरही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने निकाल जाहीर होण्यासही विलंब होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी आता निवडणूक यंत्रणेकडूनच उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्येक उमेदवाराला फेरीनिहाय किती मते मिळाली याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आकडे नोंदवून घेताना होणार्‍या चुका टळतील. मतमोजणी प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी आयोगाने यावेळी प्रथमच हे पाऊल उचलले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण ३३ तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २0 टेबल लावण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १२ मतदारसंघ आहे. त्यामुळे टेबलची एकूण संख्या २४0 होते. उमेदवारांनी त्यांचे प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर नियुक्त केले तर प्रत्येकाला मतमोजणीचा लेखाजोखा प्रशासनाला पुरवावा लागणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पण उमेदवारांच्या प्रतिनिधींना तयार आकडेवारी उपलब्ध होणार आहे. काही अपक्ष उमेदवारांच्या नावाने काही राष्ट्रीय पक्षांनी त्यांचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. हे येथे उल्लेखनीय. टपाल मतांच्याबाबतीतही यंदा आयोग अधिक दक्ष आहे. या मतांची इत्थंभूत माहिती विशिष्ट प्रपत्रात आयोगाला पाठवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)