वृद्धेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:42+5:302021-04-07T04:08:42+5:30

केळवद : धावत्या दुचाकीवरून राेडवर पडलेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना केळवद पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरसगाव शिवारात ...

Accidental death of an old man | वृद्धेचा अपघाती मृत्यू

वृद्धेचा अपघाती मृत्यू

केळवद : धावत्या दुचाकीवरून राेडवर पडलेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना केळवद पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरसगाव शिवारात साेमवारी (दि. ५) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. येनूबाई राकाजी किरनाके (६५, रा. वाॅर्ड क्र. १, मंगसा, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. येनूबाई ही राजू किरनाके यांच्यासाेबत किशाेर सलामे यांच्या दुचाकीने ट्रीपलसिट उमरी खापा येथून मंगसा येथे जात असताना, रस्त्यात अचानक खड्डा आल्याने ताेल जाऊन ती राेडवर पडली. त्यात येनूबाईच्या डाेक्याला दुखापत झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी राजू राक्याजी किरनाके (३१, रा. वाॅर्ड क्र. १, मंगसा, ता. सावनेर) यांच्या तक्रारीवरून केळवद पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार राठाेड करीत आहेत.

Web Title: Accidental death of an old man