भरधाव वाहनाला अपघात, दुचाकी चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:58 IST2020-05-16T19:57:22+5:302020-05-16T19:58:50+5:30
भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर धडकल्यामुळे गंभीर जखमी होऊन चालकाचा मृत्यू झाला.

भरधाव वाहनाला अपघात, दुचाकी चालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर धडकल्यामुळे गंभीर जखमी होऊन चालकाचा मृत्यू झाला. सनी कुमार शर्मा (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते सिव्हिल लाईन्समधील सीपीडब्ल्यूडी कॉलनीत राहत होते. शर्मा त्यांच्या दुचाकीने शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अमरावती मार्गावरील अशालक्ष्मी अपार्टमेंट समोरून जात होते. भरधाव दुचाकी अनियंत्रित झाल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. त्यामुळे शर्मा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मेडिकलमधून मिळालेल्या सूचनेच्या आधारे अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.