शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

आॅटिझमचा स्वीकार होणे महत्त्वाचे

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही.

अभिमन्यू निसवाडे : मनोचिकित्सा विभाग व ‘आयएपी’तर्फे ‘आॅटिझम’ दिन साजरानागपूर : ‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही. पण तरीही मुलाला आॅटिझम असल्याचे कळेपर्यंत हा शब्दही ऐकला नव्हता, ही प्रतिक्रिया आजही सर्रास ऐकायला मिळते. या आजाराविषयी जागरुकतेची तितकीच गरज आहे. नुसती आजाराची माहिती असणे पुरेसे नाही, तर आता समाजात या आॅटिझमचा स्वीकार होणेही महत्त्वाचे आहे. यासाठी डॉक्टरांसह प्रत्येक व्यक्तीने मूल जन्मल्यानंतर पुढील सहा महिन्यात आजाराचे निदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मनोचिकित्सा विभाग, इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स (आयएपी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जागतिक आॅटिझम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख व आयएपीचे अध्यक्ष डॉ. सी.एम.बोकडे, मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले, डॉ. मनीष ठाकरे, आयएपीचे सचिव डॉ. डहाके व ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या संचालिका ज्योती फडके उपस्थित होत्या.डॉ. निसवाडे म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर सहा महिन्यात या आजाराचे निदान झाल्यास पालक, सायकॉलिजिस्ट व विशेष शाळेच्या मदतीने दिली जाणारी बिहेविअर थेरपी व त्यांचे संवाद, भाषा, सामाजिक वर्तणूक सुधारण्यासाठी दिले जाणारे ट्रेनिंग फायद्याचे ठरते. परंतु आजार कळेपर्यंतच ५ ते ७ वर्षे उलटलेली असतात. अशा मुलांमध्ये ज्या चांगल्या स्किल्स असतात, त्यांना चालना देण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर सहभागी तज्ज्ञांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. डॉ. सुधीर महाजन यांनी आॅटिझम आणि निदान यावर मार्गदर्शन केले. डॉ. उर्मिला चव्हाण यांनी आॅटिझममध्ये येणारे इतर आजार व उपचाराची माहिती दिली. डॉ. सोफिया आसाद यांनी आॅटिझमवर आॅक्युपेशनल उपचार पद्धतीची माहिती दिली. ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या डॉ. मृणालिनी बल्लाळ व डॉ. लक्ष्मी सांबरे यांनी शाळेची माहिती देऊन, विद्यार्थ्यांचा कसा विकास साधला जातो यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. श्रेयस मागीया व डॉ. प्रांजली भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीष ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)