शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात आढळले आधार कार्ड

By admin | Updated: May 7, 2017 02:11 IST

‘सर्वसामान्यांचा एकच आधार’ असलेल्या आधार कार्डसाठी सर्वत्र विशेष मोहीम राबविण्यात आली.

डिगडोहच्या बन्सीनगरातील प्रकार : तहसील प्रशासनाने केला घटनास्थळाचा पंचनामा लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : ‘सर्वसामान्यांचा एकच आधार’ असलेल्या आधार कार्डसाठी सर्वत्र विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक नागरिकाची ओळख ठरविणाऱ्या या कार्डची वितरण प्रणाली मात्र किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय शनिवारी डिगडोह भागातील बन्सीनगरात बघावयास मिळाला. या परिसरात असलेल्या जीर्ण रेल्वे क्वॉर्टरजवळ चक्क ९८ आधार कार्ड कचऱ्यात फेकल्याचे आढळून आले. शनिवारी दुपारच्या सुमारास कचऱ्यात आधार कार्ड असल्याचे समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. परिसरातील काही सुजाण नागरिकांनी याबाबत तत्काळ तहसील प्रशासनास सूचना दिली. लागलीच तहसील कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व कार्ड ताब्यात घेतले. सर्व आधार कार्ड हे डिगडोह परिसरातील नागरिकांचे असून ते बंद लिफाफ्यात होते. विशेष म्हणजे, सदर लिफाफ्यावर पोस्टाचा शिक्कादेखील लागला आहे. परंतु जीर्ण इमारतीत हे कार्ड कुठून आणि कसे आले, याबाबत कळू शकले नाही. आधार कार्ड वितरित करण्याऐवजी या इमारतीत कसे आले, याबाबत कुणालाही माहिती नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचे आधार कार्ड इतक्या निष्काळजीने कसे हाताळले जाते, हा प्रश्नच आहे. सर्व आधार कार्ड तहसील कार्यालयात जमा या संदर्भात सूचना मिळताच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून सर्व आधार कार्ड तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सोबतच त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. पोस्ट विभागाचा शिक्का त्या लिफाफ्यांवर आहे. त्यामुळे त्याचे वितरण का करण्यात आले नाही. संबंधित कार्डधारक व्यक्ती जर मिळाली नाही तर ते स्थानिक ग्रामपंचायत अथवा तहसील कार्यालयात जमा का करण्यात आले नाही, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.