शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 1:45 AM

मध्य रेल्वेची आकडेवारी; तत्काळमधून १४७ कोटी मिळाले

नागपूर : अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकिटे रद्द केली व यातून दीडशे कोटींहून अधिकचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडे विचारणा केली होती. २०१८ मध्य रेल्वेला किती महसूल प्राप्त झाला, तिकिटे रद्द केल्यामुळे मिळालेला महसूल, रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारणा केली होती. रेल्वेने अशा प्रवाशांकडून किती दंड वसूल केला, या कालावधीत किती भिक्षेकरी व तृतीयपंथींयांवर कारवाई झाली, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ कोटी ४७ लाख ७४ हजार ६२३ लोकांनी तिकीट रद्द केले व त्यातून रेल्वेला १५२ कोटी २५ लाख ८४ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याशिवाय तत्काळ तिकिटांमधून १४९ कोटी २९ लाख ६७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला. ‘प्रीमियम’ तिकिटांपोटी ८३ कोटी ८३ लाख ७२ हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला. तर नागपूर विभागाला विविध माध्यमांतून २०१८ या वर्षात मध्य रेल्वेला ३६ कोटी ६९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.तृतीयपंथीयांवर कारवाईवर्षभरात २४२ तृतीयपंथींयावर कारवाई करण्यात आली. २०१८ मध्ये तृतीयपंथीयांकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय १८ भिक्षेकऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली, तर अनधिकृत पार्किंगप्रकरणी ४३५ जणांवर कारवाई झाली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे