'एसबीएल'च्या मालकासह २१ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:49 IST2026-03-04T12:48:42+5:302026-03-04T12:49:54+5:30

Nagpur : राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या स्फोटक कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटाचे पडसाद देशपातळीवर उमटले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने 'एसबीएल'चा मालक संजय चौधरी, आलोक चौधरीसह २१ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

A case of culpable homicide has been registered against 21 people including the owner of 'SBL', nine people have been arrested | 'एसबीएल'च्या मालकासह २१ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, नऊ जणांना अटक

A case of culpable homicide has been registered against 21 people including the owner of 'SBL', nine people have been arrested

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राऊळगाव येथील 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या स्फोटक कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटाचे पडसाद देशपातळीवर उमटले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाने 'एसबीएल'चा मालक संजय चौधरी, आलोक चौधरीसह २१ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तर कंपनीच्या उपाध्यक्षासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या दोन संचालकांनादेखील ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रविवारी सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास 'एसबीएल'मधील 'नोनल क्रिम्पिंग युनिट' मध्ये झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यवस्थ आहे. या घटनेनंतर रोष निर्माण झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या तक्रारीवरून २१ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाध्यक्ष चंद्रशेखर ब्रीजमोहन रजवाड (५८, रचना अपार्टमेंट, अंबाझरी), वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप हिंमतलाल सोलंकी (६२, महाराणा बिल्डर, काटोल मार्ग), महाव्यवस्थापक प्रदीप रघुनाथ शर्मा (५७, जय विघ्नहर्ता सोसायटी, काटोल मार्ग), प्रोडक्शन व्यवस्थापक रोशन भास्करराव राऊत (४३, दत्तवाडी), प्रोडक्शन व्यवस्थापक नीलकमल ठाणीराम डोंगरे (४८, वासंती अपार्टमेंट, आकांक्षी सोसायटी, दाभा), प्रोडक्शन सुपरयवाझर पंकज रामनरेश पांडे (३२, बेसा), लोडिंग सुपरवायझर (पान २ वर) 

मालकाला कधी होणार अटक?

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 'एसबीएल'चा मालक संजय चौधरी (रायपूर, छत्तीसगड), आलोक चौधरी, केदान पंचपुत्रे, राजू पारधी, रवींद्र पोखरना, श्रवणकुमार, सत्यवती पराशर, अलोक अवधिया, मनोजकुमार प्रसाद, मितीन चंदनमल, अतुल गुप्ता यांचादेखील समावेश आहे. कंपनीच्या मालकाला कधी अटक करण्यात येणार? असा संतप्त सवाल कामगारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title : विस्फोटक फैक्ट्री मालिक, 21 अन्य लोगों पर गैर इरादतन हत्या का मामला; नौ गिरफ्तार

Web Summary : राऊलगव विस्फोटक कारखाने में विस्फोट के बाद जिसमें 19 लोगों की मौत हो गई, पुलिस ने मालिक और 21 अन्य लोगों पर गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया, उपाध्यक्ष सहित नौ को गिरफ्तार किया। दुखद घटना के बाद जांच जारी है।

Web Title : Explosives Factory Owner, 21 Others Booked for Manslaughter; Nine Arrested

Web Summary : Following the Raulgav explosives factory blast that killed 19, police booked the owner and 21 others for culpable homicide, arresting nine, including the vice president. Investigations continue after the tragic incident.