शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातील राडा महागात...भाजप नेता मुन्ना यादव व दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: October 6, 2024 21:14 IST

राजकीय दबावामुळे कठोर कारवाई नाही : प्रकरण दाबण्यासाठी धावणारा तो भाजप आमदार कोण ?

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याच्या प्रकरणात भाजपचा वादग्रस्त नेता मुन्ना यादव व दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करता आली नाही व त्यामुळे पोलीस खात्यातच संतापाचा सूर आहे. दरम्यान, हे प्रकरण दाबण्यासाठी धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेणारा भाजपचा आमदार कोण आहे याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत.

मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ बाला यादव यांच्यात दीर्घकाळापासून शत्रुत्व आहे. या शत्रुत्वामुळे त्यांच्यात अनेक वेळा मारामारीही झाली.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मुन्नाच्या भावाच्या मुलाला करण व अर्जुन यादवच्या साथीदारांनी मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. तेथील वाहनेदेखील फोडण्यात आली. जखमींना न्यूरॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन्ही गटातील लोकांनी धंतोली पोलीस ठाणे गाठले. रात्री ९ वाजता मुन्नाचा मुलगा अर्जुन आणि करण हे दुसऱ्या गटातील सदस्यांना पोलीस ठाण्यातच शिवीगाळ करत होते. तेथील हवालदार सुभाष वासाडे यांनी करण-अर्जुनला समजावण्यास सुरुवात केली. मात्र मुन्ना व त्याच्या मुलांनी वासाडे व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. एका कर्मचाऱ्याची कॉलरदेखील पकडली. उपायुक्त राहुल मदने यांच्यासमोरदेखील यादव पिता-पुत्राने आक्रस्ताळेपणा दाखविला. या प्रकरणात मुन्ना व बाला यादव यांच्यापैकी कुणीही एकमेकांविरोधात तक्रार दिली नाही. मात्र शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी मुुन्ना, करण व अर्जुन यादव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३५१, ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस ठाण्यासमोरही धमक्या दिल्याधंतोली पोलिसांचे पथक जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. हे पाहून मुन्ना यादव पोलिसांच्या जीपजवळ गेला व तेथे वासाडे यांना धमकी दिली.

तो आमदार कोण ?दरम्यान, या घटनेनंतर मुन्ना यादवची बाजू घेत भाजपचा एक आमदार धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचला. संबंधित आमदार विधानसभेत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीदेखील केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे भाजपकडून महाजनसंपर्क मोहीम राबवत गृहसंपर्क सुरू असताना नवरात्रीदरम्यान राडा घालत दहशत निर्माण करणाऱ्या मुन्ना यादवची बाजू घेणाऱ्या आमदाराचे भाजप समर्थन करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर