नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नुकताच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या या तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली असून सहकारी डॉक्टरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बुलढाणा येथील रहिवासी रुत्वीक सागर ठाकूर (वय २६) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. दोन्ही पालक डॉक्टर असलेल्या रुत्वीकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि २७ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी कॉलेजमध्ये रुजू झाले होते. ते विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये कार्यरत होते. सध्या ते गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये राहत होते. सोमवारी ते कॉलेजला न आल्याने डॉ. उमरे यांनी त्यांच्या वडिलांना संपर्क साधला. वडिलांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रुत्वीक यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
निवासी डॉक्टरांमध्ये पसरली शोकळा
मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आला असून मंगळवारी पोस्टमॉर्टेम होणार आहे. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याची माहिती असून पोलिस विविध अंगांनी चौकशी करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे निवासी डॉक्टरांमध्ये शोककळा पसरली आहे.
Web Summary : A 26-year-old resident doctor from Nagpur Medical College died by suicide in a hotel. Rutwik Thakur, a postgraduate student in ophthalmology, was found hanging. Police are investigating the cause. The tragic event has cast a pall of gloom over the medical fraternity.
Web Summary : नागपुर के शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के 26 वर्षीय निवासी डॉक्टर ने होटल में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। नेत्ररोग विभाग में स्नातकोत्तर छात्र रुत्विक ठाकुर का शव मिला। पुलिस जांच कर रही है। इस घटना से चिकित्सा जगत में शोक है।