मास्क न लावणाऱ्या ९७ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST2021-01-16T04:09:57+5:302021-01-16T04:09:57+5:30

आतापर्यंत २७,५२४ व्यक्तींविरुद्ध कारवाई नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ९७ नागरिकांविरुद्ध ...

97 citizens fined for not wearing mask | मास्क न लावणाऱ्या ९७ नागरिकांना दंड

मास्क न लावणाऱ्या ९७ नागरिकांना दंड

आतापर्यंत २७,५२४ व्यक्तींविरुद्ध कारवाई

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ९७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ४८ हजार ५०० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कसुद्धा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २७,५२४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी २१ लाख २१ हजाराचा दंड वसूल केला आहे.

शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १६, धरमपेठ २०, हनुमाननगर ६, धंतोली ३, नेहरूनगर ५, गांधीबाग ४, सतरंजीपुरा ६, लकडगंज १७, मंगळवारी झोन अंतर्गत १७ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत २२,०५४ नागरिकांकडून ५०० रुपये प्रमाणे १ कोटी १० लाख २७ हजार वसूल करण्यात आले आहेत.

Web Title: 97 citizens fined for not wearing mask