नागपूर : राज्यातील विधानमंडळाची हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाची सूचना दोन्ही सभागृहांच्या व्यवसाय सल्ला समितीने आज दिली. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असणार आहे. सुरुवातीला दोन आठवडे हिवाळी अधिवेशन होईल, असे जाहीर झाले होते. मात्र, रविवारी कामकाज ठेवून हिवाळी अधिवेशन कालावधी फक्त एका आठवड्याचा ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन २०२५ साठी अंदाजे ९० कोटी रुपये खर्च होणार आहे. हे अधिवेशनासाठी पूर्वतयारी जसे कि मंत्र्यांचे, आमदारांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवास, कार्यालय दुरुस्ती व सजावट या कामांसाठी नमूद करण्यात आले आहे. आणि ४० लाख हे आमदार, खासदार आणि त्यांच्या पीएच्या जेवणासाठीच खर्च होतील.
अधिवेशनाचे स्वरूप साप्ताहिक असून, प्रमुख विधिमंडळीय कामकाज, विभागीय पुनरावलोकन आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा यांचा समावेश असेल. विधानसभेचे दोन्ही सभागृह विधानसभा आणि विधान परिषद या अधिवेशनात सहभागी होतील.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहिता २१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. याचा परिणाम म्हणून ८ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या घोषणांवर मर्यादा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी राज्यातील शेतकरी, महागाई, बेरोजगारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, सामान्य लोकांच्या समस्यांवर चर्चा अपेक्षित आहे. विरोध पक्षांनी विशेष शेतकरी आत्महत्या, पावसामुळे झालेले नुकसान अशा मुद्यांकडे लक्ष वेधण्याची अपेक्षा आहे.
अधिवेशनासाठी नागपूरमध्ये विविध प्रशासकीय व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात येत आहेत. वाहतूक, निवास व्यवस्था, इंटरनेट–टेलिफोन सुविधा, आरोग्य व अग्निशामक यंत्रणा यांचे नियोजन चालू आहे.
Web Summary : Maharashtra's winter session in Nagpur, December 8-14, will cost ₹90 crore. Focus areas include farmer issues, inflation, and local body concerns. Election codes may limit announcements.
Web Summary : नागपुर में 8-14 दिसंबर तक महाराष्ट्र का शीतकालीन सत्र, ₹90 करोड़ खर्च होंगे। किसान मुद्दे, महंगाई और स्थानीय निकाय चिंताएँ प्रमुख हैं। चुनाव संहिता घोषणाओं को सीमित कर सकती है।