शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसच्या ५०० जागांवर ८ ला निर्णय

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या वाढविलेल्या राज्यातील ५०० जागा या वर्षी राखून ठेवल्या. या जागांना घेऊन ८ जुलैला निर्णय होणार आहे.

नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या वाढविलेल्या राज्यातील ५०० जागा या वर्षी राखून ठेवल्या. या जागांना घेऊन ८ जुलैला निर्णय होणार आहे.देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेशक्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळाल्या होत्या. या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार होती. परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. वाढलेल्या जागा मिळविण्यासाठी दोन खासदारांसोबतच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आपल्या प्रयत्नाला वेग आणला. यामुळे आता ८ जुलैला यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी ’लोकमत’ला सांगितले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. यामुळे लवकरच यावर निर्णय होणार आहे. एमसीआय ५०० जागांना मान्यता देण्याची दाट शक्यता आहे, असे झाल्यास याचा फायदा राज्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना होईल. (प्रतिनिधी)