शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

८५ वर्षाचा वन तपस्वी

By admin | Updated: January 4, 2017 02:02 IST

४० वर्षे एखाद्या तपस्व्याप्रमाणे अरण्यात राहून सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला साहित्याच्या रूपात

नागपूर : ४० वर्षे एखाद्या तपस्व्याप्रमाणे अरण्यात राहून सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला साहित्याच्या रूपात वाचकापुढे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना वनांचा विकिपीडियाच म्हणता येईल. या वनतपस्वींना आज महाराष्ट्र शासनातर्फे विंदा करंदीकर पुरस्कार जाहीर झाला. अरण्यातील झाडे, प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे यांचे जगणे चितमपल्ली यांनी अनुभवले आणि हे अनुभव त्यांनी साहित्याच्या माध्यमातून विविध पुस्तकांच्या रूपात प्रकट केले. रानवाटा, केशराचा पाऊस, पाखरमाया, चकवाचांदण, चैत्रपालवी, जंगलाचे देणे यासारख्या अनेक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. निव्वळ अनुभवच लिहिले नाही, तर जंगल कसे टिकले, वन्यजीवांचा अधिवास कसा सुरक्षित राहील याचे सूक्ष्म अध्ययन त्यांनी केले. यापूर्वी निसर्ग अनेक साहित्याच्या लेखणीतून पात्राच्या रुपात आला. परंतु चितमपल्ली हे फक्त निसर्ग साहित्याच्या रुपात आणणारे एकमेव साहित्यिक ठरले. त्यांनी पक्षिकोश लिहिला ज्यात शेकडो पक्षांची मराठीतील नाव व इत्थंभूत माहिती या कोशात दिली. त्यांचे आजपर्यंत प्रकाशित झालेल्या साहित्यातून १ लाखावर शब्द मराठी भाषेला मिळाले आहे, जे मराठीच्या कुठल्याही कोशात नाही. लवकरचा त्यांचा प्राणिकोश प्रकाशित होणार आहे. ८५ व्या वर्षात पदार्पण केलेले मारुती चितमपल्ली यांचे सध्या मत्स्यकोश व वृक्षकोशावर संशोधन व अध्ययन सुरू आहे. मत्स्यकोशासाठी त्यांनी जवळपास ६५० वर माशांची माहिती संकलित केली आहे. वनांचा वारसा पुढे टिकवावा, यासाठी पुढे यायला हवे, जंगलात राहून अनुभव घ्यायला हवा, असे ते सांगतात.