८ प्रतिष्ठानांना ४५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST2021-03-31T04:08:32+5:302021-03-31T04:08:32+5:30

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी मंगळवारी ४४ प्रतिष्ठानांची तपासणी केली. आठ जणांकडून ४५ हजाराचा दंड ...

8 establishments fined Rs 45,000 | ८ प्रतिष्ठानांना ४५ हजाराचा दंड

८ प्रतिष्ठानांना ४५ हजाराचा दंड

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी मंगळवारी ४४ प्रतिष्ठानांची तपासणी केली. आठ जणांकडून ४५ हजाराचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने सहा प्रतिष्ठानांची तपासणी केली. धरमपेठ झोनअंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये नऊ प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. सतरंजीपुरा पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने ११ प्रतिष्ठानांची तर मंगळवारी झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 8 establishments fined Rs 45,000