२४ तासात ६९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:55+5:302021-04-13T04:07:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत ‘कोरोना’चा संसर्ग कायम आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूमुखी ...

69 deaths in 24 hours | २४ तासात ६९ मृत्यू

२४ तासात ६९ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत ‘कोरोना’चा संसर्ग कायम आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ६९ इतकी होती. २४ तासात जिल्ह्यामध्ये ५ हजार ६६१ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ८४ हजार २१७ ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळले असून, मृत्यूची संख्या ५ हजार ८३८ इतकी झाली आहे. ८ एप्रिल रोजी एका दिवसात सर्वाधिक ७३ मृत्यू झाले होते.

सोमवारी जिल्ह्यात १७ हजार ४७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ‘आरटीपीसीआर’चे १४ हजार २९ नमुने होते. शहरात ११ हजार ४९४ चाचण्या झाल्या व त्यात ३ हजार ९१२ ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले. ‘पॉझिटिव्ह’ आढळून येणाऱ्यांची टक्केवारी ३४.०५ टक्के इतकी होती. ही टक्केवारी चिंता वाढविणारी आहे. ग्रामीणमध्ये ५ हजार ५५३ चाचण्या झाल्या व १ हजार ७४४ ‘पॉझिटिव्ह’ आढळले. तेथे चाचण्यांच्या तुलनेत ‘पॉझिटिव्ह’ची टक्केवारी ३१.४० टक्के इतकी होती. एकूण जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत ‘पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांची टक्केवारी ३३.२१ टक्के इतकी होती.

सक्रिय रुग्ण ५७ हजाराहून अधिक

सोमवारी ३ हजार २४७ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २ हजार ७८८ व ग्रामीणमधील ४५९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५७ हजार ८१९ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ३६ हजार ६३६ व ग्रामीणमधील २१ हजार २८३ जणांचा समावेश आहे. सरकारी व खाजगी इस्पितळात १२ हजार ९४० रुग्ण दाखल आहेत, तर ४४ हजार ८७९ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.

Web Title: 69 deaths in 24 hours