शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीच्या अखेरपर्यंत धावणार ५५ इथेनॉल बस

By admin | Updated: March 25, 2015 02:22 IST

पायलट प्रकल्पांतर्गत शहरात धावत असलेल्या इथेनॉल बसचे सकारात्मक परिणाम दिसत आहे.

नागपूर : पायलट प्रकल्पांतर्गत शहरात धावत असलेल्या इथेनॉल बसचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. सप्टेंबरपर्यंत पाच नवीन बसेस आणि डिसेंबर अखेरीस ५० बसेस शहर बस सेवेत दाखल करण्याची स्वीडन येथील स्कॅनिया इंडिया कंपनीची तयारी आहे. एप्रिलच्या अखेरीस मनपासोबत अंतिम करार होण्याची शक्यता आहे. ही बस सध्या रिझर्व्ह बँक ते खापरी या मार्गावर धावत आहे. प्रति लिटर १.६७ कि़मी. मायलेज आहे तर डिझेलवर धावणाऱ्या लक्झरी बसचे मायलेज २ ते २.५ कि़मी. एवढे आहे. इथेनॉलची किंमत ३१ रुपये प्रति लिटर आहे. यामुळे कार्बन डाय आॅक्साईडचे उत्सर्जन ९० टक्के कमी होते. ग्रीन सिटीनुसार ही बाब नागपूरसाठी सकारात्मक आहे. रिझर्व्ह बँक ते खापरी या मार्गावर ही बस दररोज आठ वेळ ये-जा करते आणि ३५० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. स्कॅनिया इंडियाचे संचालक (विक्री व विपणन) क्रिस्टर थुलिन यांनी सांगितले की, नागपुरातील रस्त्यांवर सर्व खर्च जोडल्यास कंपनीला ६१ रुपये प्रति कि.मी. एवढा खर्च येतो. ५५ बसेससाठी कंपनीला २० ते ३० हजार चौरस जागेची गरज आहे. मनपासोबत चर्चा सुरू आहे. एका बसचे आयुष्य १५ वर्षे आहे. या तुलनेत अन्य बस ८ ते १० वर्ष सेवा देते. कंपनी इथेनॉलवर बस चालविणार असून देखरेखही करणार आहे. इथेनॉल बससंदर्भात काही नियम तयार होत आहेत. चर्चेदरम्यान स्कॅनिया कंपनीचे संचालक (विक्री) शिवकुमार व्ही. उपस्थित होते. (प्रतिनिधी)