जंगलात लागणार ४५० ‘कॅमेरा-ट्रॅप’

By Admin | Updated: May 18, 2014 01:00 IST2014-05-18T01:00:41+5:302014-05-18T01:00:41+5:30

वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह, मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला, बोर, टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वाघासह इतर सर्व वन्यप्राण्यांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी

450 'camera-trap' in the forest | जंगलात लागणार ४५० ‘कॅमेरा-ट्रॅप’

जंगलात लागणार ४५० ‘कॅमेरा-ट्रॅप’

 लवकरच खरेदी प्रक्रिया सुरू

वाघावर २४ तास पाळत ठेवण्याचा प्रयत्न

नागपूर : वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह, मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला, बोर, टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वाघासह इतर सर्व वन्यप्राण्यांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी जंगलात नवीन ‘कॅमेरा-ट्रॅप’ लावण्याची योजना आखली आहे. त्यानुसार ४५० नवीन कॅमेरा-ट्रॅप खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या खरेदीसाठी पेंच व्याघ्र संवर्धन फाऊं डेशनच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या २० मेपासून निविदा अर्जांची विक्री सुरू केली जाणार आहे. यात २७ मेपर्यंत ते अर्ज स्वीकारले जाणार असून, २८ ते ३१ मे दरम्यान कॅमेरा ट्रॅपचे प्रत्याक्षिक घेतले जाणार आहे. त्यानंतर २ जून रोजी कॅमेरा-ट्रॅप खरेदीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. सध्या वन्यजीव विभागाकडे कॅमेरा-ट्रॅपचा फार मोठा अभाव आहे. दुसरीकडे गत काही वर्षांत मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला व न्यू बोर या तीन नवीन अभयारण्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे वन्यजीव विभागाकडील वन क्षेत्र वाढले आहे. मात्र त्या तुलनेत या विभागाकडे फारच कमी कॅमेरा ट्रॅप उपलब्ध आहे. ही गरज लक्षात घेता, पेंच व्याघ्र संवर्धन फाऊं डेशनच्या माध्यमातून नवीन कॅमेरा ट्रॅपची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीव विभागाला अभयारण्यातील वाघांवर २४ तास पाळत ठेवून, त्यांच्या संख्येची अचूक आकडेवारी गोळा करण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 450 'camera-trap' in the forest