शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील 43 टक्के उमेदवार दारिद्र्य रेषेखालील...!

By योगेश पांडे | Updated: April 1, 2024 10:59 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत.

- योगेश पांडे
 नागपूर -  देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत २६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ २७ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, ४३ टक्के उमेदवार बीपीएल गटातील आहेत. 

‘लोकमत’ने सर्व उमेदवारांच्या शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सर्वच पक्ष व अपक्ष मिळून नागपूर मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत उत्पन्नाची टक्केवारी काढली असता ७ म्हणजेच २७ टक्के उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते, हे विशेष. २०१९च्या निवडणुकीत हाच आकडा १५ टक्के इतका होता. सर्वाधिक कोट्यधीश नोंदणीकृत पक्षांमध्ये असून, तीन अपक्ष कोट्यधीश आहेत. तीन उमेदवारांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नसल्याचे नमूद आहे.

२६ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न शून्य
- तब्बल ४३ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख किंवा त्याहून कमी आहे. त्यातील सात उमेदवारांनी तर त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शून्य असल्याचे दर्शविले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये आहे तर मग त्यांचा चरितार्थ चालतो तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- नागपूर मतदारसंघातून ११ अपक्ष रिंगणात आहेत. यातील तीन अपक्ष उमेदवार कोट्यधीश आहेत. 

उमेदवारांची एकूण मालमत्ता
मालमत्ता    उमेदवारांची संख्या
१ लाखाहून कमी    ६
१ लाख ते १० लाख    २
१० लाख ते २५ लाख    ३
२५ लाख ते ५० लाख    ३
५० लाख ते १ कोटी    ५
एक कोटीहून अधिक    ५
दहा कोटींहून अधिक    २

उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न
वार्षिक उत्पन्न    उमेदवारांची संख्या
शून्य    ७
एक लाखांहून कमी    ४
१ लाख ते ५ लाख    ६
५ लाख ते १० लाख    ४
१० लाख ते २५ लाख    ३
२५ लाख ते ५० लाख    ०
५० लाखांहून अधिक    २

२३ टक्के उमेदवारांची मालमत्ता एक लाखांहून कमी  
नागपूर मतदारसंघातील २३ टक्के उमेदवारांची एकूण मालमत्ता १ लाखांहून कमी आहे. तर ७.७० टक्के उमेदवारांची मालमत्ता १ लाख ते १० लाख यांच्या दरम्यान आहे. ११.५४ टक्के उमेदवारांकडील एकूण मालमत्ता १० लाख ते २५ लाख यांच्या दरम्यान आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरnagpur-pcनागपूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४