शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागनदी विकासात ४० अडथळे

By admin | Updated: July 20, 2014 01:24 IST

नागनदीचे सौंदर्यीकरण आणि विकासाच्या दरम्यान माहितीशी निगडित ४० अडथळे आहेत. ही माहिती महापालिका उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाल्यास नागनदीचा कायापालट होऊ शकणार आहे.

रुडकीच्या तज्ज्ञांकडून पाहणी : महापालिका १५ दिवसात देणार अहवालनागपूर : नागनदीचे सौंदर्यीकरण आणि विकासाच्या दरम्यान माहितीशी निगडित ४० अडथळे आहेत. ही माहिती महापालिका उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाल्यास नागनदीचा कायापालट होऊ शकणार आहे. आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी अरुण कुमार, व्ही. के. गुप्ता यांच्या नेतृत्वात शनिवारी नागनदीची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर १५ दिवसात उत्तरे देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान नागनदीची सद्यस्थिती, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, शुद्ध होणाऱ्या पाण्याबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर विविध विभागांपासून त्यांचे मत जाणून घेतले. अंबाझरी, व्हीएनआयटी, संगम चाळ, अशोक चौक, नंदनवन जवळच्या भागाचा त्यांनी दौरा केला. अरुण कुमार यांनी ४० प्रकारच्या अडचणी नागनदीच्या संदर्भात असल्याचे सांगितले. दौऱ्यात महापालिकेचे अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शाम चव्हाण, मो. इजराईल उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार रुडकीचे तज्ज्ञ दौऱ्यानंतर अहवाल तयार करून तो केंद्र शासनाकडे सोपविणार आहेत. केंद्राच्या पाच मंत्रालयांच्या एका समितीकडे हा अहवाल देण्यात येईल. अहवालात नमूद त्रुटी आणि मागितलेल्या माहितीच्या आधारे नवा विस्तृत अहवाल तयार करून महापालिकेला सोपविण्यात येईल. त्यानंतर प्रकल्पाला पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानगीनंतर अंतिम मंजुरी मिळेल. तज्ज्ञांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी महापौर अनिल सोले यांनी महापालिकेशी संबंधित विभागाचे अधिकारी, नागनदी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट (पीएमसी) मुंबईला १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. १५ दिवसात माहिती मिळाल्यास केंद्राच्या वेगवेगळ्या विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचा शुभारंभ २ ते ३ महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत ११७ कोटी रुपये खर्चून नागनदी पुनर्जीवित करण्याची योजना आहे. (प्रतिनिधी)