शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा योजनेत ४० कोटींनी वाढ मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला:विकासाला मिळणार बळ

By admin | Updated: March 5, 2015 01:52 IST

गृह जिल्ह्याच्या विकास योजनेत वाढ करून देण्याबाबत दिलेले आश्वासन

नागपूर : गृह जिल्ह्याच्या विकास योजनेत वाढ करून देण्याबाबत दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे. २५० कोटींच्या योजनेत आता ४० ते ४१ कोटींने वाढ करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ही योजना आता २९० ते २९१ कोटींवर जाणार आहे.जिल्हा नियोजन समितीने नागपूर जिल्ह्यासाठी २०१५-१६ या वर्षासाठी पाठविलेल्या ४०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या योजनेपैकी अर्थमंत्र्यांनी २५० कोटी रुपयांच्या जिल्हा विकास योजनेस मान्यता दिली होती. ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत फक्त २५ कोटी रुपयेच असल्याने राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असतानाही जिल्हा विकास योजनेत तुटपुंजी वाढ झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर टीका केली होती तर भाजपचे आमदारही अत्यल्प वाढीमुळे खूश नव्हते. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनाचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकास निधी २५० वरून ३०० कोटींपर्यंत वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करून यासंदर्भात निर्माण झालेल्या नाराजीकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्याच्या निधीत निश्चित वाढ केली जाईल, असे सांगितले होते. मात्र घोषणा केली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री निधीत किती कोटींची भर घालतात याकडे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९० ते २९१ कोटी रुपयांच्या जिल्हा विकास योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ही वाढ ४० ते ४१ कोटी रुपये एवढी आहे. पालकमंत्र्यांनी ५० कोटी वाढवून मागितले व मुख्यमंत्र्यांनी ४० ते ४१ कोटींची वाढ केली हे यातून दिसून येते. या निमित्ताने निधी वाढवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले आहे. जिल्हा विकास निधीतून जास्तीत जास्त रक्कम शहर विकासावर खर्च करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या सूचनेचे पालन पालन करताना मात्र नियोजन समितीला कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)