शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लॉकडाऊन; मलेशियात अडकले नागपूरचे ३७ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:28 IST

नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले.

ठळक मुद्देहॉटेल मॅनेजमेन्टची ट्रेनिंग रखडली पीएमओ, सीएमओकडे मदतीची विनंती

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रकोपामुळे सारे जगच स्तब्ध झाले आहे. प्रत्येक देश आपापल्या समस्या निस्तारण्यात व्यस्त आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतही आपल्या नागरिकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून धुंडाळून मायदेशी परत आणत आहे. आतापर्यंट चिन, इटली आणि अन्य देशांत अडकलेल्या नागरिकांना यशस्वरित्या परत आणले गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या निमित्ताने मलेशियात गेलेले नागपूरचे ३७ विद्यार्थी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत.साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला आणि म्हणता म्हणता चार महिन्यात या विषाणूने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. जगभरात दहा लाखाच्या वर नागरिक या विषाणूने बाधित झाले असून, ७० हजाराच्या जवळपास रुग्ण दगावलेही आहेत. भारतातही कोरोना बाधितांचा व मृतांचा आकडा वाढत आहे. याच भयावह स्थितीत नागपुरातून मलेशियाम हॉटेल मॅनेजमेण्टच्या विशेष प्रशिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी येणारा प्रत्येक दिवस काढत आहेत. नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले. तोवर सबंध जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. तेथे पोहोचताच प्रशिक्षणाचे सत्र सुरू होणार तोच मलेशियात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. मलेशिया हे जगभरात पर्यटनासाठी ओळखले जाते. येथे जगभरातून लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे, येथे संसर्गाचा धोका मोठा होता. त्याच कारणाने नागरिकांना वाचविण्यासाठी इतर देशांप्रमाणेच १८ मार्च पासून ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आला. त्यामुळे इतर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रासोबतच सर्व शैक्षणिक क्षेत्र कुलुपबंद करण्यात आले. याच लॉकडाऊनमध्ये नागपूरचे हे विद्यार्थी इपोह आणि पेनॉन्ग आईजलॅण्ड येथे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी दहा-दहाच्या संख्येत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत. अशा स्थितीत त्यांना दैनिक गरजांची पुर्तता करण्यासाठीही भांडावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे कुणालाच बाहेर पडता येत नाही आणि गरजेच्या वस्तू घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागत आहे. शिवाय वस्तू घेण्यासाठी फार लांबचा प्रवासही करावा लागत असल्याने, चिंतेत भर पडत आहे. विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी शिक्षण आणि इतर निवडक खर्च घेऊन मलेशियात दाखल झाले होते. आता तो पैसाही संपत आल्याने पुढचे दिवस कसे निघतील आणि लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता असल्याने येणारे संकट कसे निस्तरावे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याबाबत या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) शी संकेतस्थळावरून मदतीची याचना केली आहे. शिवाय एक व्हीडीओ बनवून तो सर्वत्र प्रसारितही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने, हे विद्यार्थी घाबलेल्या अवस्थेत आहेत. या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विशेष प्रयत्न होण्याची भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.इथे आम्ही सगळेच बेवारस!- आम्ही आता सगळेच विवंचनेत आहोत. बाहेर पडता येत नाही. गरजेचे साहित्य घेण्यासाठी एकालाच बाहेर पडावे लागते आणि तेही फार लांब आहे. या सगळ्या महामारित कुणाला आरोग्याची समस्या झाली तर आमच्याकडे लक्ष देणारे कुणीच नाही. आमचे येथे कुणीच नाही. आम्ही सगळेच बेवारस आहोत. ज्या प्रमाणे भारत सरकारने इटली, चिन येथून आपले नागरिक विशेष विमाननाने आणले तशीच मदत आम्हालाही हवी आहे. येथील लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढणार, याची माहिती नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला मदत करावी, अशी भावना विद्यार्थ्यांपैकी एक राज मौर्य याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी