शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

देशात सायबर गुन्हे प्रकरणांत ३६ हजार कोटींचा 'गोलमाल'; बाहेरून चालविली जातात अनेक रॅकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:23 IST

देशाबाहेरून चालविली जातात अनेक रॅकेट्स : 'मनी लाँड्रिंग अॅक्ट' अंतर्गत 'ईडी'कडून देशपातळीवर तपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून यात 'मनी लॉड्रिंग'चादेखील समावेश दिसून येतो. 'ईडी'कडून (एन्फोर्समेन्ट डायरेक्टोरेट) मोठ्या रकमांच्या हेराफेरीचा समावेश असलेल्या देशातील २५७प्रकरणांचा तपास हाती घेण्यात आला. त्यात आतापर्यंत ३६ हजार कोटींच्या रकमेचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे 'मनी लॉड्रिंग अॅक्ट' अंतर्गत 'ईडी'कडून देशपातळीवर तपास सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांची अनेक रॅकेट्स देशाबाहेरून चालविण्यात येतात. मात्र, त्यात देशातील टोळ्यादेखील सहभागी असून नागरिकांना गंडा घालण्यात आलेली रक्कम क्रिप्टोकरन्सी किंवा इतर 'मनी लॉड्रिंग' पद्धतींच्या माध्यमातून देशाबाहेर पाठविण्यात येते. अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्यानंतर गृह मंत्रालयाकडून देशपातळीवरील मोठ्या प्रकरणांची यादी तयार करण्यात आली. मोठ्या रकमांचा समावेश असलेली यातील २५७ प्रकरणे 'ईडी'कडून तपासासाठी हाती घेण्यात आली. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात फसवणुकीच्या रकमेचा शोध लावण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर होते. मनी ट्रेल व इतर तांत्रिक माध्यमांतून 'ईडी'च्या हाती फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत या प्रकरणांत एकूण ३५ हजार ९२५ कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा आकडा प्रचंड मोठा असून आता याची पाळेमुळे खणण्याचे काम सुरू आहे.

बनावट कंपन्या, डिजिटल व्यवहारांच्या 'चेन'ची तपासणी

इतक्या मोठ्या रकमेचा तपास करण्याचे मोठे आव्हान ईडीसमोर आहे. यातील काह प्रकरणांत तर सूत्रधार समान निघण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान बनावट कंपन्या, डिजिटल व्यवहारांची साखळी, ऑनलाइन फसवणूक, बैंकिंग फ्रॉड तसेच क्रिप्टोकरन्सीद्वारे होणारे व्यवहार यांचा तपास करण्यात येत आहे. या प्रक्रियेतून सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचे संशयित 'प्रोसीड्स ऑफ क्राइम' शोधण्यात यश आले असले तरी 'मनी ट्रेल'दरम्यान हा आकडा वाढण्याचीदेखील शक्यता आहे.

'सहयोग', 'समन्वय'चा 'ईडी'ला आधार

सायबर गुन्ह्यांविरुद्ध कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी 'ईडी'कडून इतर तपास यंत्रणांसोबत समन्वय साधण्यात येत आहे. ही रक्कम मोठी असून यात देशविरोधी तत्त्वदेखील सहभागी असण्याची शक्यता असल्याने देशभरातील सायबर नेटवर्कलादेखील तपासाशी जोडण्यात आले आहे. ईडीकडून या २५७ प्रकरणांतील सूत्रधार शोधण्यासाठी 'सहयोग' व 'समन्वय' या प्लॅटफॉर्मचीदेखील मदत घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Cybercrime in India: ₹36,000 Crore Scam, Many rackets operating abroad

Web Summary : India faces a massive ₹36,000 crore cybercrime scam, with rackets operating from abroad. The ED is investigating 257 cases involving money laundering, uncovering fake companies and digital fraud. Funds are routed via cryptocurrency, prompting collaboration among investigative agencies to dismantle these networks and recover illicit proceeds.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर