शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

३४ लाखांची निष्कृष्ट सुपारी जप्त

By admin | Updated: June 15, 2015 03:02 IST

निकृष्ट सुपारीची विक्री करणाऱ्या इतवारीतील एका विक्रेत्यांवर पोलीस आणि अन्न विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई केली.

नागपूर : निकृष्ट सुपारीची विक्री करणाऱ्या इतवारीतील एका विक्रेत्यांवर पोलीस आणि अन्न विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई केली. विकास एक्स्पोर्ट असे फर्मचे नाव असून विकास विजय चौरसिया संचालक आहेत. त्याच्याकडून सुमारे ३४ लाख रुपये किमतीची २४ टन सुपारी जप्त केली. ही विषारी सुपारी नागपुरात खर्रा तयार करण्यासाठी उपयोगात येत होती, हे विशेष.प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई शनिवारी रात्री केली तर रविवारी सकाळी अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी माल ताब्यात घेतला. कारवाई रविवारी दिवसभर सुरू होती. लकडगंज पोलिसांनी शिवसेनेच्या युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विकास चौरसियाच्या वर्धमाननगर येथील आॅक्ट्रॉय झोन-३ येथील गोदामावर धाड टाकली आणि सील ठोकले. त्यापूर्वी नायजेरिया देशातून आयात केलेल्या सुपारीचा कंटेनर (एमएच-४० वाय ४४४७) गोदामात खाली करण्यात आला होता. लकडगंज पोलिसांनी विकास चौरसिया याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली, त्याचवेळी शिवसेनेच्या युवा शाखेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. चौरसियाने माल आपला असून आयातीचा परवाना असल्याचा दावा केला. पण कोणतीही कागदपत्रे न दाखविल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी गोदामाला सील ठोकले.(प्रतिनिधी)निकृष्ट सुपारीची सर्रास विक्रीमहाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि सुपारीवर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने आवक सुरू आहे. विदर्भात मिळणारा खर्रा हा निकृष्ट सुपारी आणि सुगंधित तंबाखूपासून तयार केला जातो. यात निकृष्ट सुपारीचा सर्रास उपयोग केला जातो. यापूर्वीही नायजेरियातून कोट्यवधींची सुपारी आयात केल्याची माहिती असून टोळी नागपुरात सक्रिय आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच माल हाती लागला, अन्यथा या सुपारीची शहरात विक्री झाली असती. लकडगंज ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निकम आणि अन्न प्रशासन विभागातर्फे सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त नरसिंह वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि जी.के. वसावे यांनी कारवाई केली.