३३ जनावरांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:34+5:302021-06-24T04:07:34+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पाेलीस पथकाने माेवाड फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. ...

33 animals rescued | ३३ जनावरांची केली सुटका

३३ जनावरांची केली सुटका

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : पाेलीस पथकाने माेवाड फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. यात ट्रकचालकासह चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रक व जनावरे असा एकूण २० लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाई पाेलिसांनी ३३ जनावरांची सुटका करीत जीवदान दिले. ही कारवाई बुधवारी (दि. २३) करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये चंदू जमाल शेख (३२), रिजवान युसूफ शेख (२६), खालेद सालेह चाऊस (२३) व सादिक गफ्फूर माेहम्मद (४६) सर्व रा. नांदेड, यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातून आर्वी येथे गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची सूचना जलालखेडा पाेलिसांना मिळाली. त्या आधारे पाेलिसांनी माेवाड फाटा येथे नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, एमएच-२४/एबी-६७३९, एमएच-२६/बीई-१६७० क्रमांकाचे दाेन ट्रक थांबवून तपासणी केली असता, दाेन्ही ट्रकमध्ये ३३ जनावरांना निर्दयतेने काेंबून त्यांची कत्तलखान्याडे वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी सर्व जनावरांची सुटका करीत आराेपींना अटक केली. ३३ गुरांपैकी ४ बैल मृतावस्थेत आढळले. या कारवाईमध्ये १६ लाखाचे दाेन ट्रक व ४ लाख ९५ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण २० लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ४२९, सहकलम ११(१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार हरिश्चंद्र गावडे, पाेलीस उपनिरीक्षक घाेरमाडे, चेतन राठाेड, अरविंद जाधव, राजेश काेल्हे, किशाेर कांडेलकर, शंकर अवचट, हाेमगार्ड सुरेंद्र निकाेसे यांच्या पथकाने केली. गाेरक्षक विजू ठाकूर, ग्रा.पं. सदस्य मयूर दंढारे, नितीन बाेकडे, नितीन निमसरे, निकेश दामेधर यांनी पाेलिसांना सहकार्य दिले.

===Photopath===

230621\img-20210623-wa0126.jpg

===Caption===

फोटो ओळी. जनावरांनी भरलेले आयशर, आरोपी व कर्तव्य दर्शवणारे पोलीस.

Web Title: 33 animals rescued