शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील ३२ हजार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:56 IST

एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे २,१६,१६० पैकी १,८४,२३० शेतकरी कर्जमुक्तचंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ शेतकऱ्यांचा समावेश

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ लाभार्थी शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर वर्धा येथील ६,०३३, भंडारा येथील ५,४९० शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो.या योजनेंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेत कुणालाही अर्ज करायचा नाही. केवळ आधार प्रमाणिकरण करायचे आहे. ज्यांचे आधार प्रमाणिकरण असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. नागपूर विभागाचा विचार केला तर नागपुरातील बँकांकडून या योजनेसाठी एकूण २ लाख ४४ हजार १४० शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले होते. यापैकी २ लाख २८ हजार ६१८ खाते आधारप्रमाणिकरणासाठी प्राप्त झाले. यापैकी २ लाख १६ हजार १६० शेतकऱ्यांचे खाते प्रमाणिकरण झाले. या प्रमाणिकरण झालेल्या खात्यापैकी १ लाख ८४ हजार २३० सभासदांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली म्हणजेच ही खाती कर्जमुक्त झाली. ३१ हजार ९३० लाभार्थी शेतकरी अजूनही कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत एकूण १२६८ कोटी लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे.१२,४५८ लाभार्थी शेतकरी आधार प्रमाणिकरणात अडकलेयाशिवाय नागपूर विभागातील १२,४५८ लाभार्थी शेतकरी हे आधार प्रमाणिकरणात अडकले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,०४५, वर्धा ३,३००, भंडारा २,८४९, गोंदिया १,०५९, चंद्रपूर १,९२२ आणि गडचिरोली येथील २८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :agricultureशेती