नागपूर मुख्य रेल्वे स्थानकावर २७६ तर अजनीत ३१ सीसीटीव्ही कॅमेरे; दिवाळी तसेच छठ पूजेनिमित्त तगडा बंदोबस्त
By नरेश डोंगरे | Updated: October 20, 2025 20:33 IST2025-10-20T20:33:17+5:302025-10-20T20:33:58+5:30
Nagpur : दिवाळी आणि छटपूजेसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्य स्थानकावर २७६ तर अजनी रेल्वे स्थानकावर ३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दोन्ही रेल्वे स्थानकं तसेच परिसरातील घडामोडी टिपल्या जात आहेत.

276 CCTV cameras at Nagpur main railway station and 31 in Ajni; Tight security arrangements for Diwali and Chhath Puja
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी आणि छटपूजेसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्य स्थानकावर २७६ तर अजनी रेल्वे स्थानकावर ३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दोन्ही रेल्वे स्थानकं तसेच परिसरातील घडामोडी टिपल्या जात आहेत.
दिवाळीचा सण सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. आनंद आणि उत्साहाला उधाण आले आहे. हा सण आणि सणाचा आनंद आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी असंख्य जण आपापल्या गावांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली आहे. या गर्दीतून चोर-भामटे किंवा समाजकंटकांनी त्यांचे कलुषित मनसुबे पूर्ण करू नये म्हणून, रेल्वे प्रशासन, सुरक्षा दल तसेच पोलीस यांनी संयुक्त उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार, मुख्य रेल्वे स्थानकावर २७६ तर अजनी रेल्वे स्थानकावर ३१सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.
२४ तास बंदोबस्त
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) ७८ तसेच रेल्वे पोलिसांचे (जीआरपी) २८ कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात तैनात करण्यात आले आहेत. आलटून पालटून २४ तास त्यांना सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.