२.७१ लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 03:10 IST2016-04-23T03:10:09+5:302016-04-23T03:10:09+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर २ लाख ७१ हजार ...

2.71 lakhs of ganja seized | २.७१ लाखाचा गांजा जप्त

२.७१ लाखाचा गांजा जप्त

तीन आरोपींना अटक : जीटी एक्स्प्रेसने जात होते दिल्लीला
नागपूर : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर २ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा २७ किलो ७० ग्रॅम गांजासह तीन आरोपींना रंगेहाथ अटक केल्याची घटना सकाळी ११.३० वाजता घडली.
लोहमार्ग पोलिसांना तीन आरोपी दिल्लीला गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. लोहमार्ग पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मदने, सहायक पोलीस निरीक्षक वानखेडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक डोर्लीकर, महेंद्र मानकर, जितेंद्र नांदे, राहुल गवई, अनुप अढाऊ, नितीन मानकर यांनी तहसिलदार, दोन पंच, मापारी, छायाचित्रकार यांच्यासह प्लॅटफार्म क्रमांक एकवर पोहोचले.
तेथे आरोपी संतोष जागेश्वरी पंडित (२०) रा. मुकेरिया, ता. मासि जि. बहराईच उत्तर प्रदेश, संजय प्रकाश रजक (३५) रा. कुसरु स्टाफ क्वॉर्टर बोकारो, झारखंड आणि जितलाल छोटेलाल पाल (३०) रा. नवतेला ता. मासी जि. बहराईच उत्तर प्रदेश हे २७ किलो ७० ग्रॅम गांजासह जीटी एक्स्प्रेसने दिल्लीला जाण्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वर बसले होते. लगेच आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध ए़नडीपीएस अ‍ॅक्ट कलम २० (बी, सी) २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 2.71 lakhs of ganja seized