शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेला २,५८४ तर बारावीला १,४१२ परीक्षा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST

नागपूर : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी शिकत असलेल्याच शाळा केंद्र राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून नागपूर विभागीय ...

नागपूर : यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी शिकत असलेल्याच शाळा केंद्र राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ६९१ मुख्य केंद्र राहणार असून, १,७९३ उपकेंद्र राहणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी ४७४ मुख्य केंद्र व ९३८ उपकेंद्र राहणार आहेत. विशेष म्हणजे अजूनही विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

यावर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, एका बाकावर १ विद्यार्थ्याचे नियोजन केले आहे. एका वर्गात २५ ते ३० च्या आत विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी केंद्राची संख्या वाढविण्याची गरज असल्याने नागपूर बोर्डाने त्यासंदर्भात नियोजन केले आहे. दहावीसाठी ६९१ व बारावीसाठी ४७४ मुख्य केंद्र असणार आहेत. याला उपकेंद्र जोडण्यात आले आहे. परीक्षेचे साहित्य या केंद्रावरून वितरित करण्यात येणार आहे. केंद्र वाढविल्याने परीक्षेच्या आयोजनात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागणार आहे. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेत २० हजाराच्या जवळपास तर बारावीच्या परीक्षेत १७ हजाराच्या जवळपास कर्मचारी कार्यरत होते. यावर्षी यात १० टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसंदर्भातील प्रस्ताव मंडळाने बोर्डाला पाठविले आहे.

- या शाळेला केंद्र नाही

ज्या शाळेतील दहावी आणि बारावीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ पेक्षा कमी आहे, अशा शाळांना केंद्र देण्यात आले नाही. नागपूर बोर्डाने २२४ दहावीच्या व बारावीच्या ९४ शाळांची यादी तयार केली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळचेच केंद्र मिळणार आहे.

- नागपूर बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्राचे नियोजन केले आहे. पण या केंद्रावर त्याच शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून राहतील का? याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून काहीच सूचना आल्या नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन काटेकोर सुरू आहे. राज्य मंडळाकडून आलेल्या सूचनांचे पालन आम्ही करीत आहोत.

माधुरी सावरकर, विभागीय सचिव, नागपूर बोर्ड