शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचे २५ कोटी पाण्यात

By admin | Updated: March 17, 2016 03:23 IST

शहरातील दुर्बल घटक व झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

तरतूद कागदावरच : तर कसा होणार विकास?गणेश हूड नागपूरशहरातील दुर्बल घटक व झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे आवश्यक असते. परंतु २०१५-१६ या वर्षात या वस्त्यांवर छदामही खर्च न झाल्याने मागासवर्गीयांचा २५ कोटींचा निधी पाण्यात गेला आहे.शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के लोकसंख्या स्लम भागात वास्तव्यास आहे. या वस्त्यात शौचालये, रस्ते, सिवर लाईन, पावसाळी नाल्या, पेव्हमेंट, मागासवर्गीयांच्या शाळा, पथदिवे अशी कामे पाच टक्के निधीतून केली जातात. यासाठी मागासवर्गीय कल्याण समितीने वाटप केलेल्या तरतुदीनुसार झोन कार्यालयाच्या माध्यमातून हा खर्च केला जातो. परंतु गेल्या वर्षात यातील कोणतीही विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली नाही. मागासवर्गीय वस्त्यात विद्युत खांब लावणे, भूमिगत नाल्या, शौचालय निर्मिती, अतिरक्ति सवलती यासाठी ३ कोटी ५० लाख, रस्त्यांसाठी ४ कोटी ५० लाख, शाळा भवनासाठी ४० लाख, दुर्बल घटक घरकूल योजनेसाठी २ कोटी ५० लाख, खांडकी व सिमेंट पेव्हिंग यासाठी १५ लाख अशा स्वरुपाची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. परंतु हा निधी अखर्चित आहे. नागपूर शहर विकास आघाडीने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी बहुसंख्य आश्वासने पूर्ण के ल्याचा दावा केला आहे. शहरात दरवर्षी ३०० कोटींचे सिमेंट रस्ते, अविकसित ले-आऊ टच्या विकासासाठी २०० कोटी खर्च करणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी अखर्चित कसा. असा प्रश्न दुर्बल घटकांना पडला आहे. (प्रतिनिधी)समितीचे कामकाज ठप्पमागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यात महापालिकेच्या मागासवर्गीय समितीची भूमिका महत्त्वाची असते. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी समितीच्या अध्यक्ष सविता सांगोळे यांनी विकास निधी उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु याकडे आघाडीच्या नेत्यांचे दुर्लक्ष आहे. अध्यक्ष नसल्याने समितीचे कामकाज ठप्प आहे. कशी होणार स्मार्ट सिटीस्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू असल्याचा दावा महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरातील सर्व भागाचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटी होण्याची कल्पना करणे चुकीचे असल्याने मागासवर्गीय वस्त्यांचा विक ास न करता स्मार्ट सिटी कशी होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सभागृहात जाब विचारणारमागासवर्गीय वस्त्यांचा विकास व्हावा. यासाठी अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. परंतु गेल्या वर्षात या निधीतून कोणत्याही स्वरुपाची विकास कामे करण्यात आलेली नाही. याकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. या संदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नगरसेवक किशोर गजभिये व संदीप सहारे यांनी सांगितले.