शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात कोरोनाचे २४० रुग्ण, ८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. आठवड्याभरात २४० रुग्ण व ८ मृत्यूची भर पडली. शनिवारी १८ रुग्ण ...

नागपूर : कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे. आठवड्याभरात २४० रुग्ण व ८ मृत्यूची भर पडली. शनिवारी १८ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७६,९६२ तर मृतांची संख्या ९०२५वर पोहचली. आज ८१ रुग्ण बरे झाले. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट होऊन पहिल्यांदाच पाचशेखाली, ४७३ झाली आहे.

दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून सातत्याने रुग्ण वाढत होते. परंतु मे महिन्यापासून चित्र बदलले. जून महिन्यात झपाट्याने रुग्णसंख्येत घट आली. विशेष म्हणजे, जूनच्या पहिल्या आठवड्यात १६६७ रुग्ण व ७० मृत्यूची नोंद झाली. दुसºया आठवड्यात ७४७ रुग्ण व ५२ मृत्यू, तिसºया आठवड्यात ३७९ रुग्ण व १६ मृत्यू तर या चौथ्या आठवड्यात २४० रुग्ण व ८ मृत्यू झाले. आज नागपूर जिल्ह्यात ७४८० चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर आणखी कमी होऊन ०.२४ टक्क्यांवर आला आहे.

-शहरात ११ तर ग्रामीणमध्ये ६ रुग्ण

शनिवारी शहरात ११ रुग्ण व १ मृत्यू, ग्रामीणमध्ये ६ रुग्ण तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण व १ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ३,३२,४५० रुग्ण व ५,२९५ मृत्यू झाले तर, ग्रामीणमध्ये १,४२,९०६ रुग्ण व २३०६ मृत्यू झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात ४,६७,४६४ रुग्ण बरे झाले आहेत.

-रुग्णालयात १५६ रुग्ण

विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात सध्या १५६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये ३१७ रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये ३८, मेयोमध्ये ८ तर एम्समध्ये ३ रुग्ण आहेत. बहुसंख्य खासगी रुग्णालयात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

::आठवड्याची स्थिती

पहिला आठवडा : १६६७ रुग्ण : ७० मृत्यू

दुसरा आठवडा : ७४७ रुग्ण : ५२ मृत्यू

तिसरा आठवडा : ३७९ रुग्ण : १६ मृत्यू

चौथा आठवडा : २४० रुग्ण : ८ मृत्यू

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ७४८०

शहर : ११ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण : ६ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७६,९६२

ए. सक्रिय रुग्ण : ४७३

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,४६४

ए. मृत्यू : ९०२५