शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार नवीन सूचना

By admin | Updated: November 11, 2015 02:24 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला.

स्मार्ट सिटीचा दुसरा टप्पा : आता आॅनलाईन सूचना स्वीकारणारनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. शहराच्या विविध भागातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या स्मार्ट सूचनांचा स्वीकार करण्यात आला. तीन दिवसाात २० हजार नागरिकांनी सूचना केल्या आहेत. आता आॅनलाईन सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. एखादी समस्या असल्यास तिचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनाच उपाययोजना सांगण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी अर्जाचा नमुना तयार करून त्यातील विविध प्रश्नावर नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावयाचे होते. यात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग असावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन रोड शो करण्यात आले. तसेच शहरातील २० ठिकाणी दर दोन तासांनी रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांनी अर्ज भरून सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी ७ हजार तर तिसऱ्या दिवशी ३ हजार नागरिकांनी स्मार्ट सिटीसाठी सूचना केल्या आहे. तीन दिवसाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात सकाळी ८ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले. पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन लोकांच्या सूचना व कल्पना जाणून घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने बाजार व वर्दळीच्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मोहिमेला लोकांकडून प्रतिसाद मिळाला.दुसऱ्या टप्प्यात पॅन सिटी इंटरव्हेन्शवर काम करण्यात आले. विश्लेषणात्मक सर्वेचे काम सुरू आहे. लवकरच स्मार्ट अ‍ॅप बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात ३० हजार लोकांच्या सूचना अपेक्षित होत्या. परंतु २० हजार लोकांच्या सूचना आल्या. आॅनलाईन सूचना स्वीकारल्या जात आहे. यात हा आकडा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख १६ हजार ८५० नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. यात सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता . (प्रतिनिधी)१५ डिसेंबरपर्यंत अहवालस्मार्ट सिटीत नागपूर शहराचा समावेश व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. शहरातील नागरिकांकडून प्राप्त सूचनातून चांगल्या सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करावयाचा आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.