शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १६ जि.प. सदस्यांचा परतीचा मार्ग कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल केले होते त्यातील अनेकांचा पुन्हा परतण्याचा मार्ग अवघड आहे. महिला आरक्षणात काहींना फटका बसला असून, काहींच्या बाबतीत पक्ष पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. यात ओबीसी वर्गातून १६ सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेतील आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अवैध ठरवीत सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भरल्याचे आदेश दिले. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, देवका बोडखे, पूनम जोध, समीर उमप, ज्योती शिरस्कर, अर्चना भोयर, कैलास राऊत, योगेश देशमुख, ज्योती राऊत, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, भोजराज ठवकर यांचा समावेश होता. या १६ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत काढली असता, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे या दोघांचा परतीचा मार्ग अवघड आहे. त्याचबरोबर ज्या सर्कलमधून महिला सदस्य निवडून आल्या होत्या. असे दोन सर्कल सर्वसाधारण झाले आहे. यात भिष्णूर व गोधनी रेल्वे या सर्कलचा समावेश आहे. येथे महिलांना लढण्याची संधी आहे; पण येथून घरच्याच पुरुषाचा दावा केला जातोय.

त्याचबरोबर सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांचा पत्ता पक्षातूनच कापण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दावेदार वाढणार आहेत. काही सर्कलमध्ये माजी सदस्यांना विरोध होत आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांना धोका आहे. सर्व जागा खुल्या झाल्याने काही ठिकाणचे राजकीय आणि सामाजिक समीकरण बदलले आहे. यामध्ये आदिवासी भागातील सर्कल आहे. येथे ओबीसी वगळता आदिवासी समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- अनेकांना खर्चाची चिंता

दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत ३० ते ६० लाखांपर्यंतच खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आता पुन्हा कमी-जास्त प्रमाणात तेवढाच खर्च सदस्यांना करावा लागणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अपेक्षित असे काहीही सदस्यांचे साध्य झाले नाही. त्यामुळे एवढा पैसा लावायचा कसा, त्यातही पराभव झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, त्याही दृष्टिकोनातून उमेदवार विचार करीत आहेत.