शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे नागपूर विभागात १४८ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:07 IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे.

ठळक मुद्देभरपाईचा प्रस्ताव पाठविला शासनाकडे १.८९ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे. शासनाने १५ नोव्हेंंबरपूर्वी पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने झालेल्या नुकसानीपोटी १४८ कोटी २९ लाख १७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.सुरुवातीला उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतीवर परिणाम झाला. कसेबसे शेतात पीक डोलायला लागले असता, दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीतील अख्खे उभे पीक पाण्यात गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याच्या अहवालानुसार नागपूर विभागात १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने एकप्रकारे शेतकऱ्यांचे कं बरडेच मोडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार ४४० शेतकरी बाधित झाले आहे. कापूस आणि सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळे पडले. कापसाची सरकी भिजल्याने कोंब फुटले आहे. धान, ज्वारी, भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला.

स्मानी संकटामुळे शेतमालाची प्रत प्रचंड खालावली.संत्रा, मोसंबीच्या बागेतील फळे गळून पडली. गळालेली फळं डागाळली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा एकत्र अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून १४८ कोटी २९ लक्ष १७ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेती