शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

१२५ वर्षे जुना वाद तडजोडीने काढला निकाली; नागपुरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये आपसी सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:14 IST

Nagpur : शहरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये संपत्ती वाटपासह विविध मुद्यांसंदर्भात गेल्या १२५ वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर आपसी सहमती आणि तडजोडीमुळे निकाली निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मेहंदीबाग व चिमठानावाला गटामध्ये संपत्ती वाटपासह विविध मुद्यांसंदर्भात गेल्या १२५ वर्षापासून सुरू असलेला वाद अखेर आपसी सहमती आणि तडजोडीमुळे निकाली निघाला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केवळ दोन सुनावणीत दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणला.

१८४० मध्ये दाऊदी बोहरा जमातचे ४६ वे दाई सैयदना बदरुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर नवीन उत्तराधिकारीविषयी मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्य नजमुद्दीन यांना ४७ वे दाई म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हते. त्यामुळे १८९१ मध्ये मौलाना मलक व त्यांच्या अनुयायांनी नागपूर येथे मेहंदीबाग संस्था स्थापन केली.

१८९९ मध्ये मौलाना मलक यांच्या निधनानंतर मेहंदीबाग आणि चिमठानावाला, असे दोन गट तयार झाले. मेहंदीबाग गटाने मौलाना बदरुद्दीन गुलाम हुसेन मलक यांना तर, चिमठानावाला गटाने मौलाना अब्दुल कादर चिमठानावाला यांना धार्मिक प्रमुख मानले. पुढे या दोन गटांमध्ये चार हजार कोटी रुपये मूल्याच्या संपत्ती विभाजनावरून वाद वाढत गेला.

दोन्ही गटांनी परस्परांवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले. हा वाद उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातही गेला. परंतु, सर्वमान्य निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, मेहंदीबाग संस्थेच्या ७३ सदस्यांनी चिमठानावाला गटाविरुद्ध महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली असता अध्यक्ष प्यारे खान यांनी दोन्ही गटांना आपसी सहमतीने वाद संपविण्याची सूचना केली. त्यानुसार २१ जानेवारी २०२५ रोजी दोन्ही गटाने तडजोडीचा करार तयार केला. त्या आधारावर आयोगाने ११ नोव्हेंबर रोजी अंतिम आदेश जारी करून वाद निकाली काढला. 

असा आहे तडजोडीचा करार

विशेष दिवाणी दाव्यातील संपत्ती मेहंदीबाग वक्फची घोषित करण्यात आली. त्याचे व्यवस्थापन मौलाना आमिरुद्दीन मलक करतील.मौलाना अब्देअली चिमठानावाला दाऊदी अतबा-ए-मलक वक्फ, अतबा-ए-हुमायून आणि बैतुल अमन या तीन ट्रस्टचे संचालन करतील.दोन्ही जमातींचे अनुयायी एकमेकांच्या धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नाहीत. देशभरातील प्रलंबित खटले परस्पर सहमतीने मागे घेतले जातील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 125-Year Dispute Resolved Amicably Between Nagpur's Mehdibaug, Chimthanawala Groups

Web Summary : A 125-year-old dispute between Nagpur's Mehdibaug and Chimthanawala groups has been resolved through amicable agreement, facilitated by the Maharashtra State Minorities Commission. The settlement divides property management and ensures non-interference in religious affairs, with pending lawsuits to be withdrawn.
टॅग्स :nagpurनागपूर