प्रेमप्रकरणातून गर्भधारणा अन् १२ वर्षाच्या मुलीचे लावले लग्न! पतीला अटक, 'ती' सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 11:26 IST2022-03-25T11:22:39+5:302022-03-25T11:26:12+5:30

अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे.

12 year old got pregnant and got married; midc police arrested her husband she request to release him | प्रेमप्रकरणातून गर्भधारणा अन् १२ वर्षाच्या मुलीचे लावले लग्न! पतीला अटक, 'ती' सैरभैर

प्रेमप्रकरणातून गर्भधारणा अन् १२ वर्षाच्या मुलीचे लावले लग्न! पतीला अटक, 'ती' सैरभैर

ठळक मुद्देपोलिसांचाही डोक्यावर हात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १२ वर्षांच्या मुलीचे २२ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात शरीरसंबंधही प्रस्थापित होऊ लागले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. विशेष म्हणजे, हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी या दोघांचे लग्नही लावून दिले. त्यामुळे मुलीच्या उदरातील गर्भ वाढतच राहिला. त्याचा बोभाटा झाल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे पोहोचले आणि आज या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एखाद्या चित्रपट अथवा दुर्गम भागातील वाटावी अशी ही धक्कादायक घटना एमआयडीसी परिसरातील आहे.

गरीब कुटुंबातील या मुलीला आई नाही. वडीलच तिचे संगोपन करायचे. बाजूच्याच २२ वर्षीय आरोपीने तिच्यासोबत गेल्या वर्षी सूत जुळविले. त्यांची ही अजब गजब प्रेमकथा फुलली. दोघेही सर्व मर्यादा ओलांडून शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. एक दिवस ते पकडले गेले. समाजात बदनामी होईल म्हणून दोघांच्याही पालकांनी त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले अन् या दोघांनी भाड्याच्या खोलीत संसार थाटला.

दोन दिवसांपूर्वी एका आशा वर्करच्या ते लक्षात आले. तिने संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती दिली. अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले. पोलिसांनी बुधवारी मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे आता पोलिसांनीही कपाळावर हात मारून घेतला. पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी तरुण, त्याचे तसेच तिचे वडील यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. गुरुवारी रात्री ही घटना चर्चेला आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.

ती निरागस, झाली सैरभैर

अवघ्या १२ व्या वर्षी पत्नी बनून पोटात गर्भ घेऊन फिरणारी ही बालिका आता अधिकच सैरभैर झाली आहे. पतीला पोलिसांनी अटक केल्यामुळे तिला अन्न कडू झाले आहे. ‘त्याचा किंवा कुणाचाच दोष नाही. कशाला गुन्हा दाखल केला अन् त्याला अटक करण्याची गरज काय’, असे निरागस प्रश्न ती विचारत आहे.

Web Title: 12 year old got pregnant and got married; midc police arrested her husband she request to release him