शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

सपा-बसपाचे १00 आमदार भाजपच्या संपर्कात

By admin | Updated: May 10, 2014 01:30 IST

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे १00 आमदार संपर्कात असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते भाजपात प्रवेश घेतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी शुक्र वारी केला.

उमा भारती यांचा दावा : पवार सत्तेसोबत असतात

नागपूर : समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे १00 आमदार संपर्कात असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते भाजपात प्रवेश घेतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी शुक्र वारी केला.
उमा भारती यांनी शुक्रवारी नागपुरात येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, १६ मे च्या मतमोजणीनतंर देशातील चित्र स्पष्ट होईल. अमेठीतून निवडणूक लढवित असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. बनारस येथील पक्ष कार्यालयात येथील नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गंगा पूजनावर काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत त्या म्हणाल्या, काँग्रेसने आजवर पापच केले आहे. त्यांना पाप धुवायला गंगा देखील अपुरी पडेल. अशा लोकांनी या विषयी न बोलले बरे, असा टोला त्यांनी लगावला. बनारस येथून मोदी विजयी होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नुकतेच केंद्रात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ममता बॅनर्जी व जयललिता यांची मदत घ्यावी लागेल, असे विधान केले होते.
या संदर्भात विचारणा करता केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे. त्या पक्षासोबत ते असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोदी यांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली नसून आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याचे भारती यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.(प्रतिनिधी)