रस्त्यावर १० फूट खड्डा, मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST2020-11-26T04:22:58+5:302020-11-26T04:22:58+5:30

गांधीबाग व इतवारी बाजारात गर्दी नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही गांधीबाग आणि इतवारी बाजारात खरेदीदारांची गर्दी दिसून येत ...

10 feet pit on the road, Corporation's eyeball | रस्त्यावर १० फूट खड्डा, मनपाचा कानाडोळा

रस्त्यावर १० फूट खड्डा, मनपाचा कानाडोळा

गांधीबाग व इतवारी बाजारात गर्दी

नागपूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही गांधीबाग आणि इतवारी बाजारात खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे. अनेक जण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाही. दुकानांमध्ये अजूनही गारमेंट खरेदीसाठी गर्दी आहे. कोरोना नियमांचे पालन करताना काही दुकानदार मास्क न घातलेल्यांना दुकानात येऊ देत नाहीत. मनपा आणि स्थानिक प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

फूटपाथ विक्रेत्यांचे अतिक्रमण

नागपूर : सक्करदरा बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानासमोर फळे आणि फूटपाथ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने दुकानदार त्रस्त आहेत. याची तक्रार नेहरूनगर झोनमध्ये केली आहे. अतिक्रमणविरोधी पथक कारवाईसाठी येतात, तेव्हा दुकाने इतरत्र हलवितात, नंतर जैसे थे स्थिती होते. मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे त्यांना अभय असल्याचा आरोप काही दुकानदारांचा आहे. ही समस्या कायम दूर करण्याची दुकानदारांची मागणी आहे.

Web Title: 10 feet pit on the road, Corporation's eyeball