Marathi Jokes: बायकोच्या बोटांना रक्त लागलं फार; सत्य समजतात नवरा गपगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:00 IST2021-05-11T08:00:00+5:302021-05-11T08:00:02+5:30

Marathi Jokes: बायकोला चिंतेत बघून नवराही चिंताग्रस्त

Marathi Jokes caring husband misunderstood situation after watching wife in sad condition | Marathi Jokes: बायकोच्या बोटांना रक्त लागलं फार; सत्य समजतात नवरा गपगार

Marathi Jokes: बायकोच्या बोटांना रक्त लागलं फार; सत्य समजतात नवरा गपगार

एका तरुणाचं नुकतंच लग्न झालं होतं.. त्याचं बायकोवर खूप प्रेम.. खूप म्हणजे खूपच...

एके दिवशी तरुण ऑफिसमधून घरी आला.. बायकोच्या चेहऱ्यावर त्याला चिंता दिसली...

बायकोला चिंतेत पाहून तरुणही चिंताग्रस्त.. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं.. तिच्या एका हाताच्या दोन बोटांवर त्याला रक्त दिसलं..

नवऱ्यानं तिचा हात हातात घेतला.. तिची दोन्ही बोट घेऊन त्यानं ती स्वत:च्या तोंडात घातली.. आता बोटांवर रक्त दिसत नव्हतं..

नवविवाहित तरूण- काय हे..? सांगायचं ना मला.. कसं झालं हे..? भाजी चिरताना लागलं का तुला..? किती रक्त आलं होतं..?

नवविवाहित तरुणी- अहो काय केलंत तुम्ही..? ते माझं रक्त नव्हतं.. घरात डास फार झालेत हो.. ते मारले होते मी...

Web Title: Marathi Jokes caring husband misunderstood situation after watching wife in sad condition