husband and wife joke in marathi | IPL नंतर निवांत क्षणी नवरा-बायकोमधील 'सुसंवाद' 

IPL नंतर निवांत क्षणी नवरा-बायकोमधील 'सुसंवाद' 

बायको : मग काय ठरवलंत?

नवरा : कसलं काय ठरवायचं होतं?

बायको : अहो , पैशाच्या इन्व्हेस्टमेंटचं...

नवरा : कसली इन्वेस्टमेंट?  कुठले पैसे?

बायको : इतके दिवस आयपीएलमध्ये कमावलेले

नवरा : मी कुठे काय कमावले?

बायको : तुम्हाला काहीच नाही मिळालं?

नवरा : अरे मला कसे मिळतील..? मी फक्त मॅच बघत होतो.

बायको : अच्छा म्हणजे फक्त खेळाणाऱ्यांना आणि खेळवणाऱ्यांनाच मिळतात का ? मला वाटलं, गेले महिनाभर टीव्हीसमोर तंगड्या पसरून बसलेल्यांना, हातपाय आपटणाऱ्यांना, तावातावाने भांडणाऱ्यांना सुद्धा मिळतात की काय  ? 😝🤣😜😜🤣😝

Web Title: husband and wife joke in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.